देवरी.दि.२८ -राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत देवरी तालुक्यातील भर्रेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेद्रात आज रविवारी पोलिओ प्रतिबंधक लसीकरण मोहीमेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, यावेळी ४२ लाभार्थी बालकांनी पोलिओ डोस देण्यात आले,
भर्रेगाव उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गावातील ५ वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देऊन त्यांना पोलिओ या आजारापासून सुरक्षित करण्यात आले. या प्रसंगी देवरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ललित कुकडे यांचे मार्गदर्शनात भर्रेगाव केंद्रातील सीएचओ डॉ. धनश्री बिसेन, एएनएम संजीवनी जारोंडे आणि आशा वर्कर दुर्गा मेश्राम यांनी सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
आरोग्य विभागाच्या वतीने गावातील एकही बालक लस घेण्यापासून वंचित राहू नये, यासाठी चोख नियोजन करण्यात आले होते. मुख्य केंद्राव्यतिरिक्त, जे पालक केंद्रावर येऊ शकले नाहीत, त्यांच्यासाठी आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य दूत यांच्यामार्फत ‘घर-घर भेट’ (डोअर-टू-डोअर) मोहीम राबवून बालकांना डोस पाजण्यात आले.





