27.9 C
Gondiā
Saturday, July 4, 2026
Home विदर्भ जिल्हा परिषद भरती परीक्षेच्या पेपरफुटीच्या अफवांना पूर्णविराम; कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही

जिल्हा परिषद भरती परीक्षेच्या पेपरफुटीच्या अफवांना पूर्णविराम; कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही

0
10

गोंदिया, दि. 4 :महाराष्ट्र जिल्हा परिषद व जिल्हा सेवा प्रवेशोत्तर परीक्षा 2025 संदर्भात सुरू असलेल्या पेपरफुटीच्या बेरार टाइम्स च्या बातमीच्या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाने पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण येथे चौकशी करुन सत्यता पडताळणीकरीता पत्र दिले होते.पोलीस उपनिरीक्षक राहुल खारकर यांनी फुंडे सायन्स कॉलेज फुलचूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन प्रश्नपत्रिका संच तसेच तीन उत्तरपत्रिका संचांची तपासणी केली.

तपासणीदरम्यान संबंधित प्रश्नपत्रिकांवर “Govt. Central Press, Mumbai” या नावाचे लाखेचे सील सुस्थितीत आढळले. सीलमध्ये कोणतीही छेडछाड झाल्याचे चिन्ह दिसून आले नाही.याबत प्रशासनाने ‘बेरार टाइम्स’ प्रतिनिधींला विचारणा केली असता अनोळखी सुत्रांकडून माहिती मिळाल्याचे पण अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट सांगण्यात आले.

तसेच, जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर कार्यालयातील लेखा अधिकारी आणि नागपूर येथील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका संचाचे सील उघडण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कोणतीही संशयास्पद बाब आढळून आली नाही. असे तपासणी अधिकारी राहुल खारकर यांनी स्पष्ट केले.त्यामुळे परीक्षेबाबत पसरत असलेल्या अफवा निराधार असल्याचे व प्रशासनाकडून परीक्षेची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडल्याचे सांगण्यात आले आहे.

मुख्य मुद्दे:
– PSI राहुल खारकर यांच्याकडून फुंडे सायन्स कॉलेज येथे प्रत्यक्ष तपासणी
– प्रश्नपत्रिकेवरील “Govt. Central Press, Mumbai” चे सील सुस्थितीत
– CEO, विभागीय आयुक्त कार्यालय व लेखा अधिकारी यांच्या उपस्थितीत सील उघडले
– तपासणीत कोणतीही संशयास्पद बाब आढळली नाही
– पेपरफुटीच्या अफवा निराधार, परीक्षा पारदर्शकपणे पार पडली

पार्श्वभूमी:
नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय अंतर्गत जिल्हा परिषद सेवा परीक्षा 4 व 5 जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती. पेपरफुटीच्या चर्चेनंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत सर्व प्रश्नपत्रिकांची तपासणी केली आणि अफवांना पूर्णविराम दिला.