25.2 C
Gondiā
Sunday, July 5, 2026
Home विदर्भ नगर परिषद तिरोडा कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण

नगर परिषद तिरोडा कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण

0
8

चित्रा कापसे/तिरोडा-तिरोडा नगर परिषदेमार्फत पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची व सोयीची काळजी घेत नगर परिषदेतील कर्मचारी, कामगार, रोजंदारी कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी तसेच चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वितरण करण्यात आले.हा कार्यक्रम नगर परिषदेचे मुख्याधिकारी अमोल मालकर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी पार पडला. यावेळी पावसाळ्यातही नागरिकांना अखंड सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे काम करता यावे, या उद्देशाने रेनकोटचे वाटप करण्यात आले.

सदर रेनकोट श्री आनंद पाटकर तसेच स्मार्ट शिल्ट लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, मुंबई यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल नगर परिषद तिरोडाच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष अशोकजी असाटी, उपाध्यक्ष राजेश गुनेरिया, शिक्षण सभापती देवेंद्र तिवारी, बांधकाम सभापती कादर मन्सुरी, बालकल्याण सभापती सौ. कुमुद मेश्राम तसेच प्रशांत भुते यांची प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी नगर परिषद सदैव कटिबद्ध असून, नागरिकांना अधिक सक्षम व दर्जेदार सेवा देण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल, असा विश्वास व्यक्त केला.