विकासकामे व प्रलंबित विषयांवर सविस्तर सकारात्मक चर्चा
गोंदिया,दि.०८ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांनी मंगळवारला(दि.०७)गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश हर्षे यांच्या दालनात सदिच्छा भेट दिली.यावेळी जिल्हा परिषदेतील अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध विकासकामे, प्रलंबित विषय, जिल्ह्याच्या प्रगतीसंदर्भातील विषय तसेच स्थानिक प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. याप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष सुरेश हर्षे,कार्यकारी अभियंंता इंजि.प्रकाश ताकसांडे, जि.प.सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर,महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकुमार कटरे यांनी खासदार जैन यांचे वृक्ष भेट देऊन सत्कार केला.यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुरेश हर्षे,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक केतन तुरकर,बाजार समितीचे संचालक अखिलेश सेठ,केवल बघेले,रवी पटले,करण टेकाम,राजू ठाकरे, पंकज चौधरी,सुरेंद्र रहंगडाले,रघुपती अगडे,सुनील पटले,शैलेश वासनिक,घनेश्वर तिरेले,हितेश पतेह,भूपेश गौतम आदी मान्यवर उपस्थित होते.





