31 C
Gondiā
Wednesday, July 15, 2026
Home विदर्भ महिला सक्षमीकरणातून गावाच्या विकासाला चालना मिळेल – सभापती पौर्णिमाताई ढेंगे

महिला सक्षमीकरणातून गावाच्या विकासाला चालना मिळेल – सभापती पौर्णिमाताई ढेंगे

0
13

अर्जुनी-मोरगाव : तालुक्यातील बोळदे/करडगाव येथे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास योजनेअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातील सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन गुरुवार, १4 जुलै रोजी जिल्हा परिषद गोंदियाच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. पौर्णिमाताई ढेंगे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सभापती पौर्णिमाताई ढेंगे यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा विकास हा शासनाचा प्रमुख उद्देश असून दर्जेदार रस्ते, स्वच्छता व पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्यास गावाच्या सर्वांगीण प्रगतीला गती मिळते. महिलांनीही विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन गावाच्या प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा. शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य नुतनलाल सोनवाने, सरपंच बन्सिधर लंजे, उपसरपंच जितेंद्र तुमळाम,ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती मसराम, तसेच ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजनानंतर उपस्थितांनी गावातील विकासकामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत बोळदे/करडगाव यांच्या वतीने करण्यात आले.