28.4 C
Gondiā
Thursday, July 16, 2026
Home विदर्भ राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरील बिरसी येथे मार्ग प्रवासी निवारा उभारण्याची आमदार विजयभाऊ...

राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरील बिरसी येथे मार्ग प्रवासी निवारा उभारण्याची आमदार विजयभाऊ रहांगडाले यांची मागणी

0
4

तिरोडा: -राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ वरील तिरोडा–तुमसर मार्गावरील मौजा बिरसी (ता. तिरोडा, जि. गोंदिया) येथे नागरिक, शाळकरी विद्यार्थी, कर्मचारी व ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी मार्ग प्रवासी निवारा उभारण्यात यावा, अशी मागणी आमदार विजयभाऊ रहांगडाले यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव जगताप यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

आमदार रहांगडाले यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, राष्ट्रीय महामार्ग ७५३ वरील बिरसी गावातून तिरोडा, तुमसर, भंडारा व नागपूर या मार्गांवर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी बसने प्रवास करतात. या मार्गावर लाखनी, गुलाबटोला तसेच बिरसी परिसरातील शाळकरी विद्यार्थी, कर्मचारी व वयोवृद्ध नागरिक नियमितपणे बसची प्रतीक्षा करतात.सध्या गावाबाहेरील (बिरसी–बिहीरगाव मार्ग) प्रवासी निवाऱ्यामुळे अनेक नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बिरसी येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाजवळ नवीन मार्ग प्रवासी निवारा उभारण्याची स्थानिक नागरिकांची मागणी असून, ती तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी विनंती आमदार रहांगडाले यांनी केली आहे.

यावेळी कार्यकारी अभियंता संजीव जगताप यांनी निवेदन स्वीकारून प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.आमदार विजयभाऊ रहांगडाले यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधा व सुरक्षित प्रवासासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याचे यावेळी सांगितले.