युवा कोसरे कलार समाजाचा ओबीसी महामोर्च्याला पाठिंबा

0
14

गोंदिया,दि.21-गोंदिया जिल्हा युवा कोसरे कलार समाज संस्थेच्यावतीने राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने 8 डिसेंबर रोजी आयोजित ओबीसी महामोर्च्याला पाठिंबा जाहिर केला आहे.येथील शास्त्री वार्ड ओबीसी संघटनेच्यावतीने रविवारला आयोजित ओबीसी बांधवाच्या आमसभेत संस्थेच्यावतीने गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रसिध्दीप्रमुख खेमेंद्र कटरे,ओबीसी संघर्ष कृती समितीचे महासचिव मनोज मेंढे,शिशिर कटरे,उपाध्यक्ष कैलास भेलावे,भरत पाटील,शास्त्री वार्ड ओबीसी संघटनेचे अध्यक्ष खुशाल कटरे,सचिव बंशीधर शहारे,महेंद्र बिसेन,जितेश राणे यांच्याकडे पाठिब्यांचे पत्र युवा कोसरे कलार समाजाचे जिल्हाध्यक्ष तिर्थराज उके,जिल्हा सहसचिव उमेश सहारे,कोषाध्यक्ष दिनेश फरकुंडे,उपाध्यक्ष सतीश मेश्राम,संघटक राजेंद्र कावळे व गोंदिया शहर अध्यक्ष संतोष मेश्राम यांनी सोपविले.यावेळी शास्त्री वार्ड परिसरातील ओबीसी बंधु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.