26.6 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home विदर्भ डिएचओ डॉ.गोल्हार यांची सायंकाळी अतिदुर्गम पीएचसी मुल्ला आकस्मिक भेट

डिएचओ डॉ.गोल्हार यांची सायंकाळी अतिदुर्गम पीएचसी मुल्ला आकस्मिक भेट

0
70

गोंदिया, दि.12 – देवरी तालुक्यातील अतिदुर्गम प्राथमिक आरोग्य केंद्र मुल्ला येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी सायंकाळी आकस्मिक भेट देवुन कामकाजाची पाहणी केली.त्यावेळी त्यांचे सोबत जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल उपस्थित होते.

डॉ.अभिजीत गोल्हार यांनी मुख्यालयात राहुन आरोग्य सेवा पुरविणे,कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कुठलीही तक्रार येणार नाही या बाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता घेणे, आरोग्य संस्थेतील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता परिचरांनी नियमित ठेवणे, निरुपयोगी व भंगार साहित्यांचे निर्लेखन मार्गदर्शक सुचनेनुसार फार्मासिस्ट यांनी तात्काळ कार्यवाही करणे,बाह्यरुग्ण सेवा गुणवत्तापुर्ण देवुन दिवसाच्या दोन्ही वेळेत ओपीडी सुरळीत ठेवण्याच्या सुचना यावेळी दिल्या.

क्षेत्रीय भेटिदरम्यान प्रत्यक्ष लाभार्थीसह संवाद, १००% टेंसलिंग पुर्ण करावे.पिण्याचे पाणी स्तोत्रांच्या निर्जंतूकीकरणाची नियमीतता,परीसर स्वच्छता,नियमीत साथरोग-जलजन्य/ किटकजन्य आजार बाबत सर्व्हेक्षण, ग्रामपंचायतीला वेळीच आढळलेल्या त्रुटी बाबत लेखी सूचना व उपाय योजनांबाबत पाठपुरावा करणे. क्षेत्रीय भेटी नियमीत होत असल्याबाबत आठवडी शहानिशा करुन अहवाल संकलन व सादरीकरण कालर्मयादेत व्हावे.

 माताबाल संगोपण कार्यक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर प्रसूतीचे प्रमाण वाढविणे,अतिजोखमीच्या मातांचे जोखीमनिहाय यादी तयार करुन त्या पुरविण्यात आलेल्या सेवांची संकलीत माहिती प्रा.आ.केंद्रस्तरावर उपलब्ध ठेऊन मातांची वर्तमान परीस्थीतीबाबत माहिती अहवालासह उपलब्ध ठेवणे विशेषत: रक्तक्षय,अतिरक्तदाब,मधुमेह,सिकलसेल ची माहीती अद्यावत करणे.

      लसीकरण व शितसाखळी कक्ष- तापमान नोंदवही अद्यायावत असावी.लसींची साठवणूक मार्गदर्शक सूचनाप्रमाणेच असावी.ओपन व्हायल पाँलीसी मार्गदर्शकसूचनाप्रमाणे अंमलबजावणी करावी.व्ही.व्ही.एम नुसार लसींचा वापर योग्यप्रकारे करावे. नोंदवही व ई.व्हिन.पोर्टल अद्यावत असावे. प्रसूतीकक्ष नियमीत निर्जंतूकीकरण करावे व फ्यूमीगेशन नोंदवही अद्यावत असावी.  आँटोक्लेव्ह नोंदवही अद्यावत असावी.सात ट्रे परीपूर्ण असावेत व दररोज पडताळणी करावी. आँक्सीजन सिलेंडर अद्यायवत ठेवून कार्यान्वीत असल्याबाबत वेळोवेळी शहानिशा करावी.औषधभांडार कक्ष मार्गदर्शक सूचनानूसार असावे. कालबाह्य औषधी नोंदवही तीन महीन्यापूर्वीच अद्यावत असावे.दररोज औषधी खर्च नोंदवही नियमीत पुर्ण करावे.

प्रयोगशाळा तपासणी नोंदवही दररोज तपासणीनिहाय अद्यायावत असावित.फिव्हर क्लीनिकमध्ये रक्तनमूने तात्काल तपासणी करुन अहवाल वैद्यकीय अधिकारी ह्यांना त्याच दिवशी कळवावे.प्रयोगशाळेत उपलब्ध यंत्रसामुग्रीची दररोज पडताळणी करुन कार्यक्षम असल्याबाबत खातरजमा दररोज करावी.स्तनदा माता व बालकांना नियमित भेटी देवुन गावांमध्ये साथरोग प्रतिबधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सुचना दिल्या.भेटी दरम्यान त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदु वंजारी,डॉ. रामकृष्ण येळणे यांचे सह प्राथमिक आरोग्य केंद्राचे फार्मासिस्ट,परिचर,आरोग्य सेविका, आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक व आरोग्य सहायिका उपस्थित होते.

blank