25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ गोंदिया तालुक्यातील नऊही आरोग्य संस्थेत सीपीएचसी प्रशिक्षण

गोंदिया तालुक्यातील नऊही आरोग्य संस्थेत सीपीएचसी प्रशिक्षण

0
23

गोंदिया-सार्वजनीक आरोग्य मंत्री प्रकाशजी आबिटकर यांची संकल्पना व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यातील सर्व 45 प्राथमिक आरोग्य केंद्राना ‘सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा’ या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरे संपन्न होणार आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले यांच्या हस्ते दि.15 जुन रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र भानपुर येथुन जिल्हास्तरीय उद्घाटन संपन्न झाले.आतापर्यंत गोंदिया तालुक्यातील नऊही आरोग्य संस्था त्यात भानपुर,रावणवाडी,काटी, दासगाव,दवनीवाडा,एकोडी,कामठा,मोरवाही व खमारी येथे ‘सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा’ या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरे संपन्न झाली आहे तसेच पुढील पंधरवाड्यात तिरोडा तालुक्यातील पाचही आरोग्य संस्था त्यात वडेगाव,मुंडिकोटा,बेरडीपार,सुकडी/डाक व ईंदोरा येथे दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रे आयोजीत केले जाणार असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.

जिल्ह्यात ‘सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा’ प्रशिक्षणासाठी 9 प्रशिक्षकांची टिम बनविण्यात आली असुन त्यात शल्यचिकीत्सक डॉ.गुरुप्रकाश खोब्रागडे,बालरोग तज्ञ डॉ.सचिन उइके,दंतरोग तज्ञ डॉ.राजेश त्रिपाठी,पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट डॉ.राजेश बेलंबकर,मानसिक आरोग्य समुपदेशक अमित वागडे यांचेसह कुंदा कुंभरे,सुरजलाल दोनोडे,विजय मेश्राम व रंजना रोकडे यांचा समावेश आहे.

ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यत दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचविणे हे या प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.त्यात आरोग्याच्या आधुनिक उपचार पद्धती, आरोग्यविषयक सखोल माहिती सत्र, प्रभावी संवाद कौशल्ये,प्रभावी संवाद कौशल्ये विकसित करणे,वेळेत व परिणामकारक उपचार उपलब्ध करणे,मानसिक आरोग्याविषघी जागरुकता,राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम व योजनांची माहीती, गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा बाबत सखोल मार्गदर्शन आरोग्य अधिकारी,आरोग्य कर्मचारी व आशा सेविका यांना देण्यात येत असल्याची माहीती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी दिली आहे.

प्रशिक्षणात आरोग्य संस्थेतील वैद्यकीय अधिकारी,समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहायिका,आशा सेविका व आशा गट प्रवर्तक यांना आरोग्य विषयक तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येत आहे.ग्रामीण स्तरावर आरोग्याचा दर्जा सुधारण्यासाठी आणि दर्जेदार आरोग्य सेवा सुविधा पुरविण्यासाठी फील्ड लेव्हलवर या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे.या प्रशिक्षणामुळे गाव पातळीवरील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याची माहीती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे यांनी दिली आहे.