-
२७ अधिकारी व अंमलदारांना अतिउत्कृष्ट आणि ३ जणांना उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त
-
मागील पाच वर्षांत गडचिरोली पोलिसांना तब्बल २३७ शौर्य पदके
गडचिरोली:स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला (१४ ऑगस्ट २०२६) केंद्र सरकारकडून देशभरातील पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पदकांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली पोलीस दलाने पुन्हा एकदा आपल्या असीम शौर्याचा ठसा उमटवला असून, गडचिरोली पोलीस दलातील २० अधिकारी व अंमलदारांना मा. राष्ट्रपतींचे ‘पोलीस शौर्य पदक’ आणि ०१ अधिकाऱ्याला ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ जाहीर झाले आहे.
यावर्षी संपूर्ण देशभरात २७२ पोलीस शौर्य पदके आणि ६०६ गुणवत्तापूर्ण सेवा पदके घोषित झाली आहेत. त्यात एकट्या गडचिरोली पोलीस दलाला सन २०२६ मध्ये एकूण ३१ पोलीस शौर्य पदके प्राप्त झाली असून, गेल्या पाच वर्षांत ३ शौर्य चक्रे, २३७ पोलीस शौर्य पदके आणि ७ गुणवत्तापूर्ण सेवा पदके मिळाली आहेत.
भामरागड तालुक्यातील चकमकीतील शौर्याची दखल
सन २०२३ मध्ये भामरागड तालुक्यातील मौजा केडमारा आणि सन २०२४ मध्ये मौजा कंत्रनगट्टा येथे झालेल्या पोलीस-माओवादी चकमकीत गडचिरोली पोलिसांनी तब्बल ०६ माओवाद्यांना कंठस्नान घातले होते. या दोन्ही चकमकींमध्ये अत्यंत धाडसी आणि यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना या शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
‘पोलीस शौर्य पदक’ प्राप्त सन्माननीय अधिकारी व अंमलदार
१) यतिश विजयराव देशमुख – पोलीस अधीक्षक, पालघर (तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक (अभियान), गडचिरोली)
२) राजू पांडुरंग गवळी – सहाय्यक पोलीस निरीक्षक
३) वासुदेव राजम मडावी – सहाय्यक पोलीस निरीक्षक
४) दिलीप विठ्ठल आत्राम – पोहवा/५०७४
५) मासा बोरा आत्राम – पोहवा/३०३२
६) विजय किष्टय्या कोडापे – पोहवा/२६४३
७) दशरथ रामशहा मडावी – नापोअं/५०७२
८) अजय गोपालराव मडावी – पोअं/५७२४
९) गणेश चंद्रम डुब्बुला – पोअं/५७८२
१०) विजय झुरु मडावी – पोअं/५९६०
११) भुपेश मारोतराव जुमनाके – पोअं/५९०१
१२) राकेश राजम बेडकी – पोअं/४६३६
१३) सुधाकर जगन पोरतेट – पोअं/५६२१
१४) श्रीनिवास समय्या निष्ठुरी – पोअं/५५६३
१५) गणेश हनमंतू गंजीवार – पोअं/४६२९
१६) नितेश प्रभुदास टेंभेकर – पोअं/५५२९
१७) शिवाजी मेस्सो हिचामी – पोअं/५५८७
१८) संजय मल्लेश कंकाबंडावार – पोअं/५८८४
१९) राजेश शामराव किरंगे – पोअं/१२६
२०) दलसु कटिया बोगामी – पोअं/५१६७
(तसेच एका अधिकाऱ्याला राष्ट्रपतींचे ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ बहाल करण्यात आले आहे.)
३० अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘सेवा पदके’
गृह मंत्रालय (भारत सरकार) यांच्या वतीने पोलीस दलात २५ वर्षांपेक्षा जास्त निष्कलंक सेवा बजावणाऱ्या २७ अंमलदारांना ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ आणि १५ वर्षांपेक्षा अधिक निष्कलंक सेवा बजावणाऱ्या ०३ अधिकारी व अंमलदारांना ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.
पोलीस अधीक्षकांकडून कौतुक
पदकप्राप्त सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांचे गडचिरोली जिल्ह्याचे मा. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने मनापासून कौतुक केले असून त्यांच्या भावी सेवेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.





