24.5 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home विदर्भ खांबी ते बोंडगाव रस्त्यावर असलेला पूल जड वाहतुकीसाठी बंद: पर्यायी मार्गाने वाहतुक...

खांबी ते बोंडगाव रस्त्यावर असलेला पूल जड वाहतुकीसाठी बंद: पर्यायी मार्गाने वाहतुक सुरु

0
7

गोंदिया, दि.14 : सन 2026 पावसाळा पूर्वीचे नियतकालीन निरीक्षण दरम्यान बोंडगाव बाराभाटी रस्त्यावर असलेल्या लहान पुलाच्या स्लॅबचे खालील स्टील पूर्णत: दिसत असल्याने व ते गंजलेल्या अवस्थेत असल्याचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.2, गोंदिया व तहसिलदार अर्जुनी मोरगाव यांनी कळविले आहे.

        सदर पुलावरुन जड वाहने गेल्यास पूल क्षतीग्रस्त होवून अपघात व जिवीत हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मंदार पत्की यांनी मोटार अधिनियम 1988 चे कलम 115 चे तरतुदीनुसार त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये त्यांच्या प्रभावाखाली असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका अंतर्गत बाराभाटी-पिंपळगाव-खांबी-निमगाव-बोंडगाव या पर्यायी मार्गे वळविणे. बोंडगाव-निमगाव-खांबी-पिंपळगाव-बाराभाटी या पर्यायी मार्गे वळविणेकरीता खालील अटी व शर्तीच्या आधारे परवानगी देण्यात येत आहे.

          सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आवश्यक तिथे हाईटवार लावण्याची व्यवस्था करावी. वाहतुक वळविण्याची व पर्यायी वाहतुक मार्ग उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग व वाहतुक शाखा यांची राहील. वाहतुक मार्गावर आवश्यक तेथे गतिरोधक संबंधित विभागाने लावावे. वाहतुक वळविल्याबाबत दिशा निर्देशन करणारे फलक व स्वयंसेवकाची व्यवस्था संबंधित विभागाने करावी. जड-अवजड वाहतुक वळविल्याबाबत दिशा निर्देशन करणारे फलकाची व्यवस्था संबंधित विभागाने करावी. सदर वाहतुक मार्गावर कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्था बाधीत होणार नाही तसेच कायदा सुव्यवस्थेबाबत कोणताही प्रश्न  उदभवणार नाही याची दक्षता पोलीस विभागाने घेण्यात यावी. सदर रस्ता बंद केल्यावर नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दक्षता सार्वजनिक बांधकाम विभागाने घेण्यात यावी. अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची राहील. अटी व शर्तीचे पालन न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, गोंदिया यांनी कळविले आहे.