26.3 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ १७ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक

१७ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट सेवा पदक

0
5

गोंदिया : पोलिस दलामध्ये दीर्घकालीन व निष्कलंक उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या अधिकारी व अंमलदारांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर शासनातर्फे मानाची सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांच्यावतीने ही बहुप्रतिक्षित यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये गोंदिया जिल्हा पोलिस दलातील एकूण १७ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे. अति उत्कृष्ट व उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये पोलिस निरीक्षक चंद्रकांत काळे, पुरुषोत्तम अहेरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय तुपे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र मिश्रा, पोलिस हवालदार पंकज दीक्षित, रेखलाल गौतम, लक्ष्मण घरत, दीक्षितकुमार दमाहे, बलराज लांजेवार, मुश्ताक अहमद वारीस सय्यद, ज्योती कटरे, सुशील रामटेके, जावेद पठाण, पोलिस शिपाई आशिष वंजारी, रमेशकुमार उके, कृणाल चंदनबटवे आदी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सर्व पदक प्राप्त अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात पदक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व पदक प्राप्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलिस महासंचालक सदानंद दाते, जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे व अधिकाऱ्यांनी कौतूक केले आहे.