गोंदिया,दि.१९ः-येथील पुनाटोली निवासी खिलेंद्रनाथजी येडे यांचे मंगळवार(दि.१८) रोजी रात्रीला उपचारादरम्यान निधन झाले.ते सिध्दीविनायक कोचिंग संस्थेचे संचालक जलज येडे यांचे वडील होत.त्यांची अंत्ययात्रा आज(दि.१९)सकाळी ११ वाजता निजनिवास पुनाटोली सरस्वती महिला विद्यालयाच्या मागे येथून निघणार असून येथील मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.





