25.2 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home विदर्भ वीरांगना महाराणी अवंतीबाई लोधी यांची जयंती साजरी

वीरांगना महाराणी अवंतीबाई लोधी यांची जयंती साजरी

0
4

गोंदिया : शहीद वीरांगना महाराणी अवंतीबाई लोधी यांची जयंती, रिंग रोड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराणी अवंतीबाई लोधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. कार्यक्रमाला खा. राजेंद्र जैन यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी खा. राजेंद्र जैन म्हणाले, महाराणी अवंतीबाई लोधी यांनी १८५७च्या स्वातंत्र्य संग्रामात अदम्य शौर्य, त्याग आणि देशभक्तीचे दर्शन घडवित देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. त्यांच्या शौर्यपूर्ण कार्यामुळे त्यांनी जनतेच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले. त्यांचे जीवनचरित्र आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असून महिला सक्षमीकरणाचेही सर्वोत्तम उदाहरण आहे.
अमर शहीद वीरांगना महाराणी अवंतीबाई लोधी यांच्या त्याग आणि बलिदानाचे स्मरण करून त्यांच्या विचारांतून देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा आणि समाजसेवेची प्रेरणा घेण्याचे आवाहन जैन यांनी केले.कार्यक्रमाला कुंदन कटारे, गिरीशचंद्र वर्मा, घनश्याम मस्करे, नीरज उपवंशी, शिव नागपुरे, अतुल शेंडे, सोमेश उपवंशी, नरेश नागपुरे, पप्पू अटरे, नितीन नागपुरे, उमेश दमाहे, विवेक मस्करे, कल्लू मस्करे, महेंद्र बघेले, प्रवीण धामडे, मदन चिखलोंडे, आशिष नागपुरे, सुरेंद्र नागपुरे, शशी पतेह, तारा चिखलोंडे, शुभम नागपुरे, प्रीती नागपुरे, छाया नागपुरे, शंकर नागपुरे, सानू ठकरेले, रोशन लिल्हारे, आत्माराम दसरे, लवलेस नागपुरे, वैभव मस्करे व समाजबांधव उपस्थित होते.