गोंदिया : कोहळी समाज विकास मंडळ, जिल्हा गोंदिया यांच्या वतीने कोहळी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व औद्योगिक विकासासाठी विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांना देण्यात आले. यावेळी आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले व किरण पांडव उपस्थित होते. दरम्यान, कोहळी समाजाच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
निवेदनात नवेगाव बांध जलाशयाला “कोलू पाटील जलाशय” असे नामकरण करण्यात यावे, नवेगाव बांध परिसराचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास करावा, तसेच परिसरात लघु, मध्यम व कृषीपूरक उद्योगांना प्रोत्साहन द्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
याशिवाय समाजातील युवकांसाठी कौशल्य विकास व रोजगार प्रशिक्षण केंद्र सुरू करणे, युवक व महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक सहाय्य व मार्गदर्शन देणे, तसेच नवेगाव बांध परिसरात समाजाच्या इतिहास व योगदानाचे स्मारक उभारणे आदी मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
.
कोहळी समाजाच्या या मागण्यांमुळे स्थानिक रोजगार, पर्यटन, उद्योगनिर्मिती आणि परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल. त्यामुळे शासनाने मागण्यांचा सकारात्मक विचार करून आवश्यक कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनाच्या माध्यमातून कोहळी समाज विकास मंडळाच्या वतीने करण्यात आली.
निवेदन देतेवेळी उपस्थित : कोहळी समाज केंद्रीय मंडळाचे उपाध्यक्ष अमोल पाटील मुंगमोडे, कोहळी समाज संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष चामेश्वर गहाणे, कोहळी समाज विकास मंडळ गोंदियाचे जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरवार, डाॅ. गजानन डोंगरवार, बिहारी डोंगरवार, जयंत लांजेवार, रामदास बोरकर, हितेंद्र लांजेवार, हरिचंद्र मुंगमोडे, दिलीप लोधी, खुशाल डोंगरवार, विलास कापगते व अशोक परशुरामकर उपस्थित होते.





