पिएचसी सातगाव पाठोपाठ आरोग्य उपकेंद्र भर्रेगाव व धोबीसराड येथे आकस्मिक भेट
गोंदिया,दि.२४ः-जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांचे आरोग्य संस्थाचा भेटीचा धडाका सुरुच असुन दि.21 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सालेकसा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव व दुपारसत्रात देवरी तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय त्यापाठोपाठ अतिदुर्गम असलेले आरोग्य उपकेंद्र भर्रेगाव व धाबीसराड येथे आकस्मिक भेट देवुन कामकाजाची पाहणी केली.पिएचसी सातगाव भेटी दरम्यान त्यांचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण व देवरी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.ललीत कुकडे उपस्थित होते.
डॉ.अभिजीत गोल्हार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव येथे मुख्यालयात राहुन आरोग्य सेवा पुरविणे,कार्यक्षेत्रातील गावांमध्ये कुठलीही तक्रार येणार नाही या बाबत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता घेणे, आरोग्य संस्थेतील आतील व बाहेरील परिसराची स्वच्छता नियमित ठेवणे,निरुपयोगी व भंगार साहित्यांचे निर्लेखन मार्गदर्शक सुचनेनुसार तात्काळ कार्यवाही करणे, बाह्यरुग्ण सेवा गुणवत्तापुर्ण देवुन दिवसाच्या दोन्ही वेळेत ओपीडी सुरळीत ठेवण्याच्या सुचना यावेळी दिल्या.आरोग्य कर्मचारी यांनी भेटिदरम्यान प्रत्यक्ष लाभार्थीसह संवाद, १००% टेंसलिंग पुर्ण करावे.पिण्याचे पाणी स्तोत्रांच्या निर्जंतूकीकरणाची नियमीतता,नियमीत साथरोग-जलजन्य/ किटकजन्य आजार बाबत सर्व्हेक्षण, ग्रामपंचायतीला वेळीच आढळलेल्या त्रुटी बाबत लेखी सूचना व उपाय योजनांबाबत पाठपुरावा करणे.क्षेत्रीय भेटी नियमीत होत असल्याबाबत आठवडी शहानिशा करुन अहवाल संकलन व सादरीकरण कालर्मयादेत व्हावे असे विविध सुचना वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना दिल्यात.
लसीकरण व शितसाखळी कक्ष-तापमान नोंदवही अद्यायावत असावी.लसींची साठवणूक मार्गदर्शक सूचनाप्रमाणेच असावी.ओपन व्हायल पाँलीसी मार्गदर्शकसूचनाप्रमाणे अंमलबजावणी करावी.व्ही.व्ही.एम नुसार लसींचा वापर योग्यप्रकारे करावे. नोंदवही व ई.व्हिन.पोर्टल अद्यावत असावे. प्रसूतीकक्ष नियमीत निर्जंतूकीकरण करावे व फ्यूमीगेशन नोंदवही अद्यावत असावी. आँटोक्लेव्ह नोंदवही अद्यावत असावी.सात ट्रे परीपूर्ण असावेत व दररोज पडताळणी करावी. आँक्सीजन सिलेंडर अद्यायवत ठेवून कार्यान्वीत असल्याबाबत वेळोवेळी शहानिशा करावी.
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र धाबेसराड येथे गप्पी मासे टाका तसेच हिवताप सर्वेक्षण नोंदवहींची तपासणी करुन कार्यक्षेत्रात ताप रुग्णांचा शोध व किटकशास्त्रीय सर्वेक्षण करुन आश्रमशाळा व स्थलांतरीत रुग्णांचे रक्त नमुने घेणे तसेच विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सुचना यावेळी दिल्या.
आरोग्यवर्धिनी उपकेंद्र भर्रेगाव येथे माता बाल संगोपण कार्यक्रम अंतर्गत प्रसुती,नियमित लसीकरण,अतिजोखमीच्या मातांचे जोखीमनिहाय यादी तयार करुन त्या पुरविण्यात आलेल्या सेवांची संकलीत करणे,अंसासर्गिक आजाराबाबत अतिरक्तदाब,मधुमेह,सिकलसेलची माहीती अद्यावत करुन कार्यक्षेत्रातील अतिदुर्धर अंथरुणाला खिळुन रहाणारे,गरोदर व स्तनदा माता यांना गुणात्मक आरोग्य सेवा देण्याचे सुचना यावेळी केल्या.
भेटी दरम्यान त्यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गभणे यांचे सह प्राथमिक आरोग्य केंद्रात केंद्र व उपकेंद्रात फार्मासिस्ट,परिचर,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,आरोग्य सहाय्यक व आरोग्य सहायिका उपस्थित होते.तर दोन्ही उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेविका कर्तव्यस्थळी कार्यरत होते.





