23.8 C
Gondiā
Thursday, September 3, 2026
Home विदर्भ जि.प.सदस्य किरणभाऊ पारधी यांच्या विकास निधीतून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुविधा

जि.प.सदस्य किरणभाऊ पारधी यांच्या विकास निधीतून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुविधा

0
29

चित्रा कापसे/तिरोडा-गावाचा विकास म्हणजे केवळ रस्ते, नाल्या आणि मोठी विकासकामे नव्हेत, तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील गरजा ओळखून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हाच खऱ्या लोकसेवेचा अर्थ आहे. याच सामाजिक जाणिवेतून जि. प. सदस्य श्री. किरणभाऊ पारधी यांच्या विकास निधीतून गावकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याकरिता टँकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.
गावातील सामाजिक, धार्मिक कार्यक्रम तसेच नागरिकांच्या दैनंदिन पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. गरजू नागरिकांनी या सुविधेचा अल्पदरात अथवा निःशुल्क स्वरूपात योग्य पद्धतीने जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमाच्या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच गावकरी मंडळींची प्रमुख उपस्थिती होती. नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन उपलब्ध करून दिलेल्या या छोट्याशा पण अत्यंत उपयुक्त सुविधेचे गावकऱ्यांनी मनापासून स्वागत व कौतुक केले.
“मोठी कामे विकासाची ओळख देतात, पण छोट्या सुविधा माणुसकीची ओळख निर्माण करतात,” या भावनेतून किरणभाऊ पारधी यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जनतेच्या गरजा ओळखून छोट्या-छोट्या उपक्रमांतून मोठा सामाजिक बदल घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या किरणभाऊ पारधी यांना गावकऱ्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा, तसेच भविष्यातही अशाच प्रकारे जनसेवेचे कार्य सुरू ठेवावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.