30.7 C
Gondiā
Wednesday, September 9, 2026
Home विदर्भ गुजरात येथील राष्ट्रीय ‘हॉस्पिटल डिझास्टर मॅनेजमेंट’ कार्यशाळेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोल्हार यांची निवड

गुजरात येथील राष्ट्रीय ‘हॉस्पिटल डिझास्टर मॅनेजमेंट’ कार्यशाळेसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोल्हार यांची निवड

0
8

गोंदिया: राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय (भारत सरकार) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “झोनल वर्कशॉप ऑन हॉस्पिटल सेफ्टी अँड हॉस्पिटल डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅनिंग (HDMP)” या अत्यंत महत्त्वाच्या दोन दिवसीय कार्यशाळेसाठी गोंदिया जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांची निवड करण्यात आली आहे.ही कार्यशाळा दि. ८ व ९ सप्टेंबर २०२६ रोजी गुजरात येथे आयोजित करण्यात आली आहे.

नुकताच पहील्या चारमाही आरोग्य निर्देशंका मानाकंनेत राज्यात जिल्हा आरोग्य अधिकारी रॅंकीग मध्ये गोंदिया जिल्ह्याने प्रथम मानांकन प्राप्त केले आहे.त्याचेच फळ निष्पत्ती मुळे आयुक्त आरोग्य सेवा व अभियान संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे कार्यालयीन पत्रानुसार राज्यातुन जिल्हा आरोग्य अधिकारी प्रवर्गातुन गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांची नामनिर्देशन झाले असुन त्यांचे सोबत जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातुन जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा डॉ.संदीपकुमार गजभिये व जिल्हा शल्य चिकित्सक बीड डॉ.सतीश सोलंके हे सुद्धा उपस्थित राहणार आहे.आपत्तीच्या काळात रुग्णालयांची सुरक्षा आणि आरोग्य व्यवस्थापनाचे नियोजन अधिक बळकट करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.या राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेत देशातील निवडक तज्ज्ञ आणि आरोग्य अधिकारी सहभागी होत असून, महाराष्ट्रातून डीएचओ संवर्गातुन गोंदियाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

डॉ.गोल्हार यांची ही निवड गोंदिया जिल्हा परिषदेसह संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद मानली जात आहे.कार्यशाळेत मिळालेल्या मार्गदर्शनाचा आणि नियोजनाचा फायदा भविष्यात गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य सेवा व आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी होईल, असा विश्वास आरोग्य वर्तुळातून व्यक्त केला जात आहे.