‘ऊठ ओबीसी जागो हो…’चा देवरी तालुक्यात गजर

0
15

देवरी,दि.५ :- ‘ऊठ ओबीसी जागा हो…’, ‘नवे पर्व…’, ‘ओबीसी असाल तर…’अशा गगनभेदी घोषणा देत ओबीसी जनचेतना रॅली काल रविवारी (ता.४) देवरी तालुक्यात दाखल झाली. तालुक्याच्या सीमेवर असलेल्या हरदोली येथे आमगाव तालुका कृती समितीने या रॅलीला देवरी तालुका कृती समितीच्या स्वाधीन केले. येथे ओबीसी महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी गगनभेदी घोषणा देत या जनचेतना यात्रेचे जंगी स्वागत केले. दरम्यान, संपूर्ण तालुक्यात या रॅलीला उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र होते.
या जनचेतना रॅलीचे रथ घेऊन तालुक्यात दाखल झालेले जिल्हाध्यक्ष बबलू कटरे आणि भंडारा-गोंदिया जिल्हा समन्वयक जीवन लंजे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे स्वागत तालुका महिला समितीच्या सुमन बिसेन, पुष्पलता पटले, अनिता भदाडे, पिंकी कटकवार, अंजली दरवडे, अर्चना झिंगरे, चित्रा चालखोर,रेखा बोपचे,प्रीती भांडारकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेश चांदेवार, जिल्हासचिव सुरेश भदाडे, तालुकाध्यक्ष कृष्णा ब्राम्हणकर, भरत शरणागत, पारस कटकवार, दिलीप दुरुगकर, संजय दरवडे, राजेश फुंडे, चंद्रसेन रहांगडाले,ज्योतिबा धरमशहारे, मनोज भुरे, मुकेश चालखोर, राम गायधने, गणेश मुनिश्वर, योगेंद्र कटरे, सचिन भांडारकर,छोटेलाल बिसेन, संतोष शाहू,बापू निर्वाण,उमेंद्र बोपचे, सुजित टेटे आदी कार्यकर्त्यांनी केले. या नंतर या रॅलीने देवाटोला, ओवारा, डोंगरगाव, सावली, लोहारा, चारभाटा, मुल्ला, वडेगाव, भागी, देवरी, शेडेपार,कन्हाळगाव, आलेवाडा. चिचगड, वांढरा, गणूटोला, ककोडी, चिल्हाटी, पदमपुर, गडेगाव,पलानगाव, फुटाणा, नकटी शिरपूर या मार्गे तालुक्यात भ्रमण केले. दरम्यान, अनेक ठिकाणी पदयात्रा सुद्धा करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे तालुक्यात या रॅलीला उदंड प्रतिसाद मिळाला असून ठिकठिकाणी जंगी स्वागतसुद्धा करण्यात आले. गावागावात पोचणाऱ्या या रॅलीतून जिल्हाध्यक्ष बबलू कटरे आणि जीवन लंजे यांनी मार्गदर्शन केले. शेडेपार येथे प्रा. जी.एम. मेश्राम यांनी सुद्धा आपल्या ओजस्वी वाणीने ओबीसीबांधवांना संविधानाने कोणते अधिकार दिले, याबाबत सविस्तर विवेचन केले. या रॅलीच्या माध्यमातून गावागावात जनचेतना करण्यात आली. यावेळी प्रत्येक गावात ओबीसी महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाज संघटनांनीसुद्धा पाठिंबा दिला06-dec-18
ही रॅली जसजशी तालुक्यात पुढे सरकत होती, तसतशी समाजबांधवांची संख्या वाढत असल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणच्या समाज संघटनांनी या जनचेतना यात्रेच्या पदाधिकाऱ्यांना आपापल्या समाज संघटनांचा जाहीर पाठिंबा असल्याचे लेखी पत्र दिले. देवरी येथील सभेत सर्ववर्गीय कलार समाजाच्या वतीने सुरेश भदाडे, पारस कटकवार, दिलीप दुरुगकर, अंजली दरवडे, अनिता भदाडे, संजय दरवडे, छन्नू नेवरगडे यांनी, शाहू समाजाच्या वतीने राजकुमार शाहू आणि संतोष शाहू, तेली समाजाच्या वतीने भास्कर धरमशहारे, भय्यालाल चांदेवार, राजेश चांदेवार, मनोज भुरे, सोनार समाजाच्या वतीने फावींद्र हाडगे आणि सुजीत टेटे आणि पोवार समाजाच्या वतीने सुमन बिसेन, छोटेलाल बिसेन, भरत शरणागत यांनी ओबीसी महामोर्च्याला आपापल्या समाज संघटनांचा पाठिंबा असल्याचे लेखी पत्र जिल्हाध्यक्ष बबलू कटरे आणि जीवन लंजे यांच्या स्वाधीन केले.