भ्रष्टाचारमुक्त व विकासासाठी काँग्रेसला निवडून द्या -अशोक चव्हाण

0
7

गोंदिया,दि.05-राज्यासह केंद्रात आलेल्या भाजपप्रणीत सरकारने गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराशिवाय काहीच विकास करु शकले नसून काँग्रेसच्याच योजनांची नावे बदलून आपली योजना म्हणून थोपविणाèया केंद्रातील नरेंद्र राज्यातील देवेंद्र सरकारमुळे मात्र जनता द्ररिद्य झाल्याची टिका महाराष्ट्र प्रदेश काँगेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.अशोक चव्हाण हे आज गोंदिया व तिरोडा येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आले असता बोलत होते.चव्हाण यांनी आधी तिरोडा येथे नंतर रात्रीला गोंदियाच्या सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणात जाहिर सभा आयोजित करण्यात आली होती.त्या सभेत ते बोलत होते.चव्हाण यांनी गोंदिया विधानसभा मतदारसंघाचाच विकास नव्हे तर गोंदिया शहराला सुंदर व स्वच्छ बनविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला.परंतु एकहाती सत्ता पालिकेत न मिळाल्याने पाहिजे ति विकासाची कामे होऊ शकली नाही त्यासाठी यावेळी काँग्रेसच्या नगराध्यक्षासंह सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी मंचावर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राकेश ठाकूर,आमदार गोपालदास अग्रवाल,माजी आमदार सेवक वाघाये,रामरतन राऊत,महासचिव डॉŸ.बबनराव तायवाडे,झामqसह बघेले,जि.प.अध्यक्ष उषा मेंढे,जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कटरे आदी काँग्रेसनेते उपस्थित होते.चव्हाण आपल्या भाषणात म्हणाले की प्रधानमंत्री नरेंंद्र मोदी यांच्या नोटबंदी कार्यक्रमामुळे देशातील गोरगरीब जनतेला मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावे लागले असून काहींना जीव सुध्दा गमवावा लागला आहे.नोटबंदी हा फसलेला कार्यक्रम असून जनतेने भाजपच्या खोट्या आश्वासनाला बळी पडू नये असे आवाहन केले.त्याचप्रमाणे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये छुपी युती असून जनतेने या दोघांनाही धडा शिकविण्याचे आवाहन करीत गोंदिया शहराला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी काँगेस उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.यावेळी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी प्रफुल पटेल यांचे नाव न घेता काम कुठलाही नाही पण मीच केले हे सांगणाèयाच्या पक्षाला धडा शिकविण्याचे आवाहन करीत राष्ट्रवादी व भाजपमुळेच शहराचा विकास खुंटला गेला व १२५ कोटीची भुमीगत गटार योजना रद्द होऊन केंद्राला त्याचे ७३ कोटी १५ दिवसापुर्वीच परत करण्याची वेळ या नगरपरिषदेवर आल्याने विकास कोण करु शकतो याचा विचार करुनच मतदान करण्याचे आवाहन केले.