बसपने रोखले राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसला

0
10

खेमेंद्र कटरे
गोंदिया,दि.१०- जिल्ह्यातील तिरोडा नगरपरिषद ही राष्ट्रवादीच्या ताब्यातील नगरपरिषद गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून मात्र या निवडणुकीत भाजपने जनतेतील नगराध्यक्षाच्या माध्यमातून नगरपरिषद आपल्या ताब्यात घेतली आहे.तर गोंदिया नगरपरिषदेचे अध्यक्षपद भाजपने टिकवून ठेवले आहे.दोन्ही नगरपरिषदेच्या निकालानंतर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला असून राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्यासाठी हा पराभव महत्वाचा ठरला आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादीला पराभवाचा सामना सातत्याने करावा लागत असल्याने प्रफुल पटेल कुठेतरी नियोजनात कमी पडत असल्याचे स्पष्ट झाले असून ही हार पटेलांचीच मानावी लागणार आहे.कारण त्यांना आपल्या गृहनगरातील नगराध्यक्षपदच नव्हे तर त्यांच्याच वार्डातील नगरसेवक सुध्दा त्यांना निवडून आणता आलेला नाही.
एकप्रकारे राष्ट्रवादीला थांबविण्यासाठी काँग्रेस व भाजपने खेळलेली छुपी खेळी सुध्दा यशस्वी ठरली आहे.तर गेल्या एकदशकापासून नगरपरिषदेत न पोचलेली बहुजन समाज पार्टी यावेळी राष्ट्रवादीतून बसपात गेलेले पंकज यादव यांच्यामाध्यमातून नगपरिषदेतून पोचली आहे.बसपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार पकंज यादव हे विजयी झाले नसले तरी त्यांनी ५ जागा qजकून राष्ट्रवादी काँग्रेसलाच फटका पोचविला आहे.सोबतच शिवसेना जी गेल्यावेळी ३ जागेवर होती तीला यावेळी १ जागा गमवावी लागली आहे.काँगेस व राष्ट्रवादीलाही फटका सहन करावा लागला आहे.मात्र भारतीय जनता पक्षाला जास्त नुकसान या निवडणूकीत गोंदिया व तिरोड्यात सुध्दा झालेले नाही.तिरोड्यात उलट भाजपच्या एका सदस्यावरुन ५ वर वाढली आहे.काँग्रेसला एक जागाही वाचविता आली नाही तर राष्ट्रवादीला किमान पाच ते सहा जागांचा फटका बसला आहे.गोंदिया व तिरोडा येथील निवडणुक पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्यासाठी प्रतिष्ठेची महत्वाची ठरली होती.दोन्ही जागी नगराध्यक्षपद भाजपने qजकल्याने त्यांचे राजकीय वजन मात्र वाढले आहे.तिरोड्यात भाजपचे आमदार विजय रहागंडाले यांनी एकहाती नियोजन आपल्या ताब्यात घेऊन ही निवडणूक qजकण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला सुध्दा यश मिळाले आहे.दोन्ही ठिकाणच्या नगराध्यक्षपदाच्या विजयात मुख्यमंत्र्याची सभा महत्वाची ठरली.
भाजपने नगराद्यक्षपद काबीज केले असले तरी मात्र नगरसेवकांचे बहुमत राष्ट्रवादीकडे असल्याने सत्ता चालवितांना भाजपला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप बनसोड यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक होती भाजपला मात्र नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी मुख्यमंत्र्याची सभा महत्वाची निकालावरुन ठरल्याचे दिसून येते.१७ जागेसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ९ जागा qजकल्या,भाजपने ५ व शिवसेनेने २ तर अपक्षाने १ जागा qजकली.काँग्रेसला मागच्यावेळची एक जागाही टिकविता आली नाही.
तिरोडा नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलासाठी राखीव होते.यासाठी ७ महिला उमेदवार रिंगणात होत्या या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सोनाली अमृत देशपांडे यांनी ५९८७ मते घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ममता आनंद बैस यांना ५८९२ मते मिळाली.देशपांडे यांनी बैस यांचा ९५ मतांनी पराभव केला.तिसèया क्रमांकावर बहुजन समाज पक्षाच्या पौर्णिमा मेश्राम १३५८ मते घेऊन राहिल्या तर ४ थ्या क्रमांकावर काँग्रेसच्या ममता दुबे राहिल्या.
गोंदिया नगरपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्षपदासह सर्वाधिक १८ जागावर विजय मिळविला.नगराध्यक्षपदी भाजपचे अशोक इंगळे यांना २४५०० तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक (गप्पु)गुप्ता यांना १८५५१ मते मिळाली. इंगळे यांनी ५ हजार ९४९ मतांनी गुप्ता यांचा पराभव केला. तिसèया क्रमांकावर काँग्रेसचे राकेश ठाकुर राहिले यांना १२५५३ मते मिळाली.तर चौथ्या क्रमांकावर बसपचे पंकज यादव यांना ९२६९ मते मिळाली. आणि पाचव्या क्रमांकावर शिवसेनेचे दुर्गेश रहागंडाले यांना ३३२२ मते मिळाले.
गोंदिया नगरपरिषदेच्या २१ प्रभागातील ४२ जागापैकी १८ जागा भारतीय जनता पक्षाने,९ जागा काँग्रेसने ,७ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने,बहुजन समाज पक्षाने ५ जागा,शिवसेनेने २ जागा आणि अपक्षाने १ जागा qजकली.प्रभाग क्रमांक ५ मधून काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार सचिन गोंविद शेंडे यांनी विजय मिळविला.