सिकलसेल जनजागृती सप्ताहाचे आयोजन

0
27

गोंदिया, :- ११ डिसेंबर ते १७ डिसेंबर दरम्यान सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह विविध ठिकाणी राबविण्यात आला. या सप्ताहादरम्यान जिल्हयातील सर्व आरोग्य संस्थामध्ये सिकलसेल आजाराबाबद जनजागृती व सोल्युबिलीटी चाचणी मोफत करण्यात आली. ११ डिसेंबर रोजी गोंदिया येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते यांचे हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात आले. उदघाटन प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एच.एस.कळमकर, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.दुधे, विकृतीशात्रज्ञ डॉ.वाघमारे केटीएस रक्‍त संक्रमण अधिकारी डॉ.सुवर्णा हुबेकर बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती अर्चना वानखेडे, जिल्हा आयुष अधिकारी व डॉ.मिना वट्टी उपस्थित होते.
या सप्ताहादरम्यान दिनांक १२ डिसेंबर रोजी बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय गोंदिया येथे गरोदर मातांना आजाराची माहिती देण्यात आली. दिनांक १३ डिसेंबर रोजी एस.एस.गर्ल्स कॉलेज येथे एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्याना माहिती देण्यात आली . दिनांक १४ डिसेंबर राजी कुंभारेनगर येथील नागरी दवाखान्यात जनजागृती कार्यक्रम व तपासणी शिबीर घेण्यात आले. दिनांक १५ डिसेंबर राजी राजस्थानी कन्या शाळा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताह अंतर्गत मार्गदर्शन व सिकलसेल सोल्युबिलीटी चाचणी शिबीर घेण्यात आले. या सप्ताहामध्ये वाहक व ग्रस्त रुग्णांचे शिबिर घेण्यात आले. दिनांक १६ डिसेंबर रोजी एस.एस.गर्ल्स कॉलेज येथे अधिकारी/पदाधिकारी व कर्मचारी यांना सिकलसेल आजाराबाबत माहिती देण्यात आली. दिनांक १७ डिसेंबर २०१४ रोजी बस स्थानक येथे जनजागृती करण्यात आली. या सप्ताहात २३ हजार ४६६ रुग्णांच्या सोल्युबिलिटी चाचणी करण्यात आली. त्यात ६१५ पॉझिटीव्ह आढळुन आले. तसेच ६६८ गरोदर मातांचे सुध्दा सोल्युबिलिटी चाचणी करण्यात आली. या सप्ताहाला यशस्‍वी करण्याकरीता जिल्हयाचे सिकलसेल समुपदेशक व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांनी सहकार्य केले.