शेतकरी बांधवांसाठी किसान एस.एम.एस सेवा

0
16

गोंदिया:- भारत सरकार कृषि विभागाच्या वतीने शेतक-यांसाठी दिनांक १६ जुलै २०१३ पासून फार्मर पोर्टल सुरु करण्यात आले असून यामध्ये कृ‍षि संबंधित वेगवेगळया विषयाची माहिती राज्यनिहाय उपलब्ध आहे. या पोर्टलमध्ये ाज्ञळीरप.र्सेीं.ळप मधून राज्यातील प्रत्येक शेतक-यास हवामान, किड-रोग नियंत्रण, बाजारभाव,पीक उत्पादन इत्यादी बाबत एस.एम.एस. प्राप्त करुन घेण्याकरीता नोंदणी करता येणे सहज शक्य आहे. या सेवेमध्ये जवळपास १६ लाख शेतक-यांनी नोंदणी केलेली असून ते या सेवेचा लाभ घेत आहेत. ही सेवा शेतक-यांसाठी विनामूल्य असून या सेवेव्दारे वेळीच माहिती एस.एम.एस व्दारे प्राप्त होत असल्याने शेतक-यांना शेतीकामाचे नियोजन करणे सुलभ झाले आहे.
या सेवेत नवीन नोंदणी करण्यासाठी सहभाग घेता येऊ शकतो. याकरिता १) ाज्ञळीरप.र्सेीं.ळप वर जाऊन ठशसळीींीरींळेप सेीं डचड या विकल्पातून नोंदणी करणे, कृषि उपसंचालक (प्रकल्प) कृषि आयुक्तालय, शिवाजीनगर पुणे-५ यांचेकडे पत्राव्दारे स्वत:चे नांव, मोबाईल नंबर, तालुका, जिल्हा,पिके, ची माहिती अंतर्भूत करुन ज्ञळीरपीाी.ाहऽसारळश्र.लो या श-ारळश्र वर स्वत:ची माहिती पाठवून (स्वत:चे नाव,मोबाईल नंबर,तालुका,जिल्हा,ची माहिती अंतर्भूत करुन ) शेतकरी बांधवांना सहभागी होता येईल. असे कृषि आयुक्तालय,महाराष्ट्र राज्य, पूणेचे कृषी उपसंचालक यांनी कळविले आहे.