सुपलीपार सेवा सहकारी संस्थेवर फुंडे गटाचा ताबा

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

आमगाव दि.१५ : तालुक्यातील सुपलीपार येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेवर किसान आघाडी पॅनलने दणदणीत विजय पÑाप्त केला. अध्यक्षस्थानी राजेश फुंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
सुपलीपार म्हणजे आमगाव तालुक्यात राजकारणाचा गड समजण्यात येते. येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची निवडणूक २२ जानेवारी रोजी पार पडली. या निवडणुकीत किसान आघाडी पॅनेलने विजय पÑाप्त केला. किसान आघाडी पॅनेलचे राजू फुंडे, भोजलाल भांडारकर, तुळशीराम मेंढे, श्रीगोपाल बÑाम्हणकर, बाबुलाल कापसे, हेतराम बहेकार, मोहनलाल तरोणे, विनोद वाढई, लहू टेंभरे, श्रीमती फुंडकर, श्रीमती डोये, राजेश सिंधीमेश्राम, छन्नुलाल गजभिये यांची संचालक म्हणून निवड झाली. ३ फेबÑुवारी रोजी घेण्यात आलेल्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्ष म्हणून राजेश फुंडे यांची, तर उपाध्यक्ष म्हणून भोजराज बÑाम्हणकर यांची निवड झाली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे कौतूक करण्यात येत आहे.