हेड क्लर्कचा मनमानी कारभार दुधशितरण केंद्र वाèयावर

0
8

डेअरी मॅनेजरसह दुग्धशाळा व्यवस्थापकाचे पद रिक्त
गोंदिया,दि.२६-गोंदिया येथील कुडवा परिसरात असलेल्या शासकीय दुध शितकरण केंद्रात वरिष्ठ अधिकारीच नसल्याने हेडक्लर्क आपली मनमानी करीत कारभार करीत असल्याच्या चर्चेने दुग्धविकास यंत्रणेतील अधिकारी कर्मचारीच नव्हे तर दुधपुरवठा करणाèया शेतकरी व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.शासकीय दुधशितकर केंद्र कुडवा येथे गेल्या अनेक महिन्यापासून डेअरी मॅनेजरचे पद रिक्त आहे.सोबतच दुग्धशाळा व्यवस्थापकाचे पद सुध्दा रिक्त आहे.तर बहुतांश कर्मचारी हे नागपूर,भंडारा येथून अपडाऊन करणारे असल्याने विदर्भवीर ठरले आहेत.गेल्याकाही दिवसापासून दुग्धशाळेत ३ वाजेनंतर भेट दिल्यास बहुतांश अधिकारी गायब असल्याचे व कधी कधी तर पाचवाजताच कार्यालयाला कुलूप असल्याचे बघावयास मिळाले.जेव्हा कार्यालय बंद होण्याची वेळ ही ५.४५ असते.त्यातच वरिष्ठ अधिकारी यांचे पद रिक्त असल्याने हेडक्लर्क आपल्या मनमर्जीने काम करीत साहित्याची खरेदी असो की इतर कामे करुन शासकीय निधीची विल्हेवाट लावत असल्याची चर्चा आहे.तर गेल्या महिन्याभरापासून दुध फेडरेशन,व्यापारी संस्था,दुधसंस्था,शेतकरी यांना दुधाचे व इतर पेमेंट न झाल्याने त्यांच्यातही नाराजी दिसून येते.सोबतच कर्मचारी वर्गाचेही वेतन अडल्याचे बोलले जात आहे.