आज देवरीत ओबीसी संघर्ष कृती समितीची जिल्हा बैठक

0
20

देवरी,दि.२६-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीची जिल्हा बैठक येथील जिल्हा परिषद विश्रामगृह देवरी येथे २६ फेबुवारीला दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आली आहे.या बैठकित जनचेतना यात्रेचा हिशोबासह जिल्हा अधिवेशन व पुढील कार्यक्रमावर चर्चा करण्यात येणार आहे.जिल्हा पदाधिकारी,तालुका कार्यकारीणी पदाधिकारी यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वराडे,महासचिव मनोज मेंढे,शिशिर कटरे,उपाध्यक्ष राजेश चांदेवार यांनी केले आहे.