देवरी नगरपंचायत होणार हागणदारी मुक्त

0
10

देवरी- देवरी नगरपंचायतीने शहर हागणदारी मुक्त करण्याच्या उद्देशाने 6 गुडमार्निंग पथकांची निर्मिती करण्यात आली अाहे. 1 मार्चपासून शहरात उघड्यावर बसणाऱ्यांचे गुवाबपुष्प देवून त्यांना शौचालयाचे बांधकाम करण्यास प्रोत्साहीत केले जात आहे.
मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी यासाठी पुढाकार घेतला अाहे. या पथकात उपाध्यक्ष ओमप्रकाश रामटेके, बांधकाम सभापती आफताब शेख, अर्थ व नियोजन सभापती रितेश अग्रवाल, नगरसेवक प्रवीण दहिकर, नगरसेविका भूमिता बागडे यांचा समावेश आहे. नगर पंचायतीकडून मिळालेले वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम केल्यानंतर उघड्यावर शौचास बसल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल, अशी तंबी उघड्यावर जाणाऱ्यांना दिली जात आहे. स्वच्छ भारत मोहीेमेत ज्यांनी अजूनपर्यंत शौचलय बांधकामाकरिता अर्ज केला नाही, अशा लोकांना नगर पंचायत कार्यालयात बोलावून त्यांचा अर्ज भरून घेत अनुदानाचा पहिला हप्ता देऊन 15 दिवसात त्यांनी शौचालयाचे बांधकाम करून उघड्यावर जाणे बंद करावे, अशी सूचना देण्यात येत आहे. उघड्यावर शौचास जाणाऱ्यांना यापुढे कोणतेही दाखले देण्यात येणार नाही.
2011 च्या जनगणनेनुसार शहरात एकूण 721 कुटुंबांना वैयक्तिक शौचालय देण्याचे उद्देश असून त्यापैकी 650 लाभार्थ्यांना पहिला हप्ता तर 550 लाभार्थ्यांना दुसर्या हप्त्याचे वाटप करण्यात आले आहे.
यात एकूण 400 शौचालयाचे बांधकाम पूर्ण झाले असून 250 शौचालयाचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. 21 मार्च 2017 रोजी देवरी शहर संपूर्ण हागणदारी मुक्त गोषित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी दिली आहे.