एप्रिल ते जून ५२ संभाव्य पाणी टंचाईची गावे घोषित

0
15

गोंदिया,दि.८ : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा गोंदिया यांनी सर्वेक्षण करुन जिल्ह्यातील निरिक्षण विहिरींच्या पाण्याच्या पातळीमध्ये झालेला बदल लक्षात घेवून विहित पध्दतीचा अवलंब करुन पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता असलेल्या गावांना संभाव्य टंचाईग्रस्त गावे म्हणून घोषीत करण्याबाबत शिफारस केली आहे. त्यानुसार १ एप्रिल ते ३० जून २०१७ पर्यंतच्या कालावधीकरीता जिल्ह्यातील ५२ संभाव्य पाणी टंचाईची गावे घोषित करण्यात येत आहे. सदर गावे पुढील प्रमाणे आहेत.अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गवर्रा,उमरपायली. गोंदिया तालुक्यातील बघोली, बाजारटोला, भागवतटोला, ब्राम्हणटोला, डांगुर्ली, गर्रा/बुज., गर्रा/खुर्द, गर्राटोला, गोंडीटोला, कलारटोला, कन्हारटोला, कासा, कासाटोला, काटी,किन्ही, मरारटोला, मुंडीपार, पुजारीटोला, शिवणी, शिवणीटोला, तेढवा, तेढवाटोला, उमरी, उमरीटोला. सडक/अर्जुनी तालुक्यातील लेंडेझरी, मालीजुंगा, बोनटोला,बोनकीटोला,चिखली,हलबीटोला,कोहळीटोला,पळसगाव,पळसगावटोला,पिंपरी,राका,राकाटोला,कोहलीपार,कोहळीटोला,मोहघाट, प्रधानटोला, कोयलारी, सालेधरणी, शेंडा. सालेकसा तालुक्यातील गोर्रे, लभानधरणी, लोहारा, मरकाखांदा, निंबा, निंबाटोला, तिरखेडी आदी गावात संभाव्य पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे.