आष्टी येथील पेपरमिलच्या गोदामाला आग; ८ कोटी रुपयांचे नुकसान

0
5

गडचिरोली दि. 15: चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील बिल्ट ग्राफिक्स पेपर मिलच्या गोदामाला सोमवारी (१३ मार्च) सकाळी सव्वाअकराच्या सुमारास आग लागली. ही आग सायंकाळपर्यंत विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीत ८ कोटी रुपयांचे नुकसान झाले.
आष्टी येथील पेपरमिल मागील काही महिन्यांपासून बंद आहे. काही विभागांचे काम सुरू होते. सोमवारी अचानक पेपरमिलमध्ये आग लागली. यामध्ये कच्च्या मालासोबतच पेपरमिल सुरू करण्यासाठी आणलेले साहित्यही जळाले असल्याचे बोलले जात आहे. सोमवारी रंगपंचमीचा दिवस असल्यामुळे पेपरमिलमध्ये काही कामगार कर्तव्यावर होते. मात्र, गोदाम परिसरात सुरक्षा कर्मचारी, कामगार नव्हते.
दरम्यान, वीज तंत्रज्ञ मंगल निमसरकार यांच्या गोदामामधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच सुरक्षा पर्यवेक्षक सुधाकर कोकोडे यांना दूरध्वनीवरून घटनेबाबत माहिती देण्यात आली. दुपारी पाऊण वाजेपासून मध्यरात्री १२ वाजेपर्यंत बल्लारपूर पेपरमिल, नगर परिषद गडचिरोली, नगर परिषद बल्लारपूर येथील अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.