गोंदियात परिविक्षा अधिकार्‍याला चार हजारांची लाच घेताना अटक

0
10

गोंदिया दि.22 –: येथील महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या परिविक्षा अधिकार्‍याला चार हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई मंगळवारी (दि.२१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. राजू नारायण बोधले (५४) असे या अधिकार्‍याचे नाव आहे. राज्य शासनाच्या महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांच्याकडून विशेष दत्तक संस्था स्थापन करण्याकरिता प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यानुसार तिरोडा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव असलेल्या तक्रारदाराने महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करून प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात सादर करण्यासाठी परिविक्षा अधिकारी राजू बोधले याने तक्रारदाराला १0 हजार रुपयांची मागणी केली. त्यापैकी पाच हजार रुपये पहिल्यांदा देण्यास सांगितले; परंतु लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.