नागपूर देशात ‘स्मार्ट मॉडेल’ ठरेल-नंदा जिचकार

0
7

नागपूर दि.8: स्मार्ट सिटीच्या तिसऱ्या टप्प्यात निवड झाल्यानंतर काही महिन्यातच नागपूर शहरात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली. स्मार्ट स्ट्रीट व सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प मार्गदर्शक ठरत आहेत. एवढेच नव्हे तर स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड झालेल्या देशभरातील अन्य शहरासांठी नागपूर ‘स्मार्ट मॉडेल’ ठरेल असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
नागपूर महापालिकेतर्फे व इलेटस टेक्नो मीडिया प्रा.लि यांच्या सहकार्याने नागपुरात आयोजित दोन दिवसीय स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही.के. गौतम, महापालिके तील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त श्रावण हर्डीकर, बार्सिलोनाचे माजी उपमहापौर अ‍ॅन्थोनी विवस थामस, विश्वराज इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष अरुण लखानी, सिस्कोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल नायर, फिलीप्स लायटिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष चितळे, बँक आफ महाराष्ट्रचे वरिष्ठ महाव्यवस्थापक एन.व्ही पुजारी, एनसीसीचे संचालक रघु अल्लोरी, इलिट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी गुप्ता आदी उपस्थित होते.