24.5 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home विदर्भ भूमिअभिलेखाला लाच घेताना अटक

भूमिअभिलेखाला लाच घेताना अटक

0
28

नागपूर,,दि.5 -पारशिवनी  येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील साहाय्यक प्रभारी अजय मधुकर कावळे (३९) यांनी सालई/माहुलीच्या तक्रारदार शेतकर्‍याकडून जमिनीची मोजणी करून हद्द कायम ठेवण्यासाठी तडजोडीअंती ११ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली.

ही कारवाई नागपूर एसीबीच्या पथकाने सापळा रचून शुक्रवारी (५ मे) दुपारच्या सुमारास केली. आरोपी तक्रारदाराच्या वडिलाच्या नावे शेतजमीन आहे. परंतु, शासनाने केलेल्या शेतीच्या पुनर्मोजणीत ही जमीन 0.४३ हेक्टर आर.ने कमी दाखविण्यात आली. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी क्षेत्र दुरुस्तीकरिता उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाकडे अर्ज केला. त्यांनी पूर्वीचे क्षेत्र कायम करण्याचा आदेश दिला. परत सुधारित आदेशाप्रमाणे जमिनीची मोजणी करून हद्द कायम करण्यासाठी तक्रारदाराने नियमानुसार शुल्क भरले. दरम्यान, या कार्यालयात कार्यरत प्रभारी उपअधीक्षक अजय मधुकर कावळे यांच्याशी भेट झाली असता, ‘आपण हद्द कायम करून देऊ यासाठी १५ हजार रुपयांचा मोबदला लागेल’, असे सांगितले. परंतु तक्रारदाराला ही रक्कम मुळीच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी नागपूर एसीबीच्या पथकाकडे धाव घेतली. एसीबीने मागणीसंदर्भात पडताळणी करून शुक्रवारला सापळा रचला. १५ हजारांपैकी ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी पारशिवनी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.