पवन तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ

0
10
वाढदिवसाच्या शुभेच्छा

गोरेगाव,दि.15 : पवन तलावातील २५ वर्षापासूनचा गाळ हा शेतीसाठी सोनखतच आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हे सोनखत त्वरित घेऊन जावे व आपली शेतजमीन सुपीक करावी. शासनाची तलावातील गाळ उपसा ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदन ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी ंंकेले.येथील पवन तलावातील गाळ उपसण्याच्या व योजनेच्या प्रारंभाप्रसंगी रविवारी (दि.१४) ते बोलत होते. यावेळी तहसीलदार कल्याणकुमार डहाट, उप विभागीय अधिकारी सिध्दार्थ भंडारे, मुख्याधिकारी संदीप चिद्रवार, बीडीओ दिनेश हरिणखेडे, नगर पंचायतचे सर्व सदस्य, माजी उपसरपंच राहुल कटरे प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी गाळात कुदळ मारून व जेसीबीचे पूजन करून शासनाच्या गाळ उपसा योजनेचा शुभारंभ केला.

नगर पंचायतच्या सरहद्दीत असलेल्या राधाकृष्ण मंदिराजवळील पवन तलाव हा फार पूर्वीपासूनचा तलाव असून या तलावाचे पाणी व परिसरातील जागेमध्ये घाण वाढल्यामुळे लगतच्या वस्तीत त्रास वाढला होता. त्यामुळे काही धार्मिक संघटना व युवा शक्तीच्या सहयोगाने लोकसहभागातून श्रमदानाच्या माध्यमातून पवन तलावाचे सौंदर्यीकरणाचे काम नगर पंचायतचे उपाध्यक्ष आशिष बारेवार यांनी १ जानेवारी २०१७ ला हाती घेतले. बघता-बघता तलावाच्या आजूबाजूचा कचरा साफ झाला. लोकसहभाग वाढत गेला. निसर्गरम्य वातावरणाची जाण होताच तलावाच्या परिसरात तीन बेंचेस लोकसहभागातून लावण्यात आले. शासनाची तलाव गाळ उपसा योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली.गाळ काढून खोलीकरणाची एक दिवसाची जबाबदारी गायत्री परिवारने घेऊन व युवा शक्तीचे प्रणेते बारेवार यांनी तातडीने दोन जेसीबी लावून गाळ काढण्याची तयारी दर्शवून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या हस्ते गाळ उपसा योजनेचा पहिला तलाव पवन तलावचा गाळ उपसा योजनेचा शुभारंभ केला.