फुलसिंगनगर येथिल बंजारासमाज घरकूल योजने पासुन वंचित

0
13

आलापल्ली,दि.26 – अहेरी तालुक्यातील फुलसिंगनगर (तान्डा) हे १०० च्या वर लोकसंख्या असलेले बंजारा समाजाचे गाव आहे. मात्र येथील बंजारा समाजाला ६० वर्षाचा कालावधी लोटूनही कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळालेला नाही. अद्यापही समाजातील नागरिक कुडाच्या झोपडीतच वास्तव्य करीत आहेत.   त्यामुळे या समाजाला घरकूल योजनेचा लाभ देण्याची मागणी होत आहे.

अहेरी तालुक्यातील फुलसिंगनगर (तान्डा) हे गाव स्वातंत्र्य काळापासून शासनाच्या योजनांपासून कोसो दूर आहे. या तान्डा वस्तीवर अद्यापही एकही शासकीय योजना पोहोचलेली नाही. त्यामुळे समाजाचा विकास खुंटला आहे. येथील नागरिक अद्यापही कुडाच्या झोपडीतच वास्तव्य करीत असून घरकूलापासून वंचित आहेत. गावातील लोकसंख्या १०० च्यावर पोहोचली आहे. शासकीय एकीकडे शेवटच्या नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्याचे आश्वासन देते. मात्र याठिकाणी उलटे दिसून येत आहे.
६० वर्षे लोटूनही येथील नागरिकांना कोणत्याच शासकीय योजनांची माहिती नाही. स्वकष्टाने समाजातील नागरिक आपले जीवन जगत आहेत. झोपडीवजा घरात कुटुंबासह उदरनिर्वाह करीत आहेत. त्यामुळे शासन, प्रशासनाने या समाजाकडे लक्ष देवून येथील समाजबांधवांना घरकूल मंजूर करावे, अशी मागणी समाजातील नागरिकांनी केली आहे