खासदार पटेलांच्या नेतृत्वात जयस्तंभ चौकात रास्तारोको

0
17

गोंदिया,दि.०१ :गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर राज्य व केंद्रातील शेतकरी विरोधी धोरणाला घेऊन धरणे आंदोलन करुन शेतकर्यांच्या मागण्यासांठी जयस्तंभ चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.हजारोच्या संख्येत सहभागी झालेल्या या आंदोलनातील जनतेमुळे पोलिसांना चांगलीच धावपळ करावी लागली.आधीपासूनच चोख बंदोबस्त ठेवून बसलेल्या पोलिसांनाही पटेलांच्या नेतृत्वातील रास्तारोकोमुळे शहरातील वाहतुक व्यवस्था खोळबंली.जिल्हाधिकारी येऊन त्यांनी निवेदन स्विकारावे अशी मागणी केली परंतु जिल्हाधिकारी हे रुग्णालयात भरती असल्याने त्यांच्या जागी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश मोहिते व उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांनी निवेदन स्विकारले.पावसाने हजेरी लावल्याने रास्ता रोको आंदोलन आटोपता घेत पोलिसांनी प्रफुल पटेलासंह राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी व नेत्यांना पोलिस गाडीत भरुन शहर पोलिस ठाण्यात नेले.सर्वांना अटक करुन नंतर सोडण्यात आले.

खा.पटेलांनी या आधी डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.त्यानंतर हजारोच्या संख्येत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी,शेतकरी,शेतमजुरासह जयस्तंभ चौकात आंदोलन केले.त्याआधी त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बोलतांना सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य सेवेचा बोझवारा उडाला असून बाईगंगाबाई रुग्णालयातील बालमृत्यू व मातामृत्यू प्रकरणामुळे शहराचे नाव बदनाम झाल्याचा आरोप करीत आरोग्य सेवा सुधारली नाही तर आपण खपवून घेणार नसल्याचा सज्जड दम वैद्यकिय अधिकायाना व सरकारी यंत्रणेला दिला.शेतकर्याना हमी भावाच्या नावावर गाजर दाखवून सत्तेत आलेल्या भाजपला आता मात्र बोनसच काय तर कर्जमाफी व हमीभाव सुध्दा देता  येत नसल्याचे सांगावे लागत असल्याने निव्वळ सत्तेसाठीच भाजपच्या नेत्यांनी आश्वासन दिल्याचा आरोप करीत जनता त्रस्त झाली असून भाजपला त्यांची जागा नक्कीच दाखवेल असेही म्हणाले.

यावेळी मनोहर चंद्रिकापुरे,राजेंद्र जैन,छाया चव्हाण,विनोद हरिणखेडे,राजलक्ष्मी तुरकर,किशोर तरोणे आदींनीही विचार व्यक्त केले.संचालन गंगाधर परशुरामकर यांनी केले.आंदोलनात माजी आमदार राजेंद्र जैन,विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे.राजलक्ष्मी तुरकर, किशोर तरोणे, माजी  जि प उपाध्यक्ष छाया चव्हाण,मनोहर चंद्रिकापुरे,गंगाधर परशुरामकर,मनोज डोंगरे,नरेश माहेश्वरी,अविनाश जायस्वास,केवल बघेले,होम्ंद्र कटरे,अविनाश काशीवार,हिरालाल चव्हाण,केतन तुरकर,अशोक शहारे,शिव शर्मा,अशोक गुप्ता,संजीव राय,राजेश वर्मा,मिलन राऊत,लता रहांगडाले,जितेश टेंभरे,खुशबू टेंभरे,विणा बिसेन,पंचम बिसेन,महेंद्र चौधरी,प्रभाकर दोनोडे,सतीश देशमुख, तुकाराम बोहरे,प्रेम रहागंडाले,उध्दव मेहंदले,राजू एन.जैन,भय्यू चौबे,छोटुभाऊ पटले,राजेश भक्तवर्ती,किशोर पारधी, आदी मोठया संख्येने सहभागी झाले होते.यावेळी बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.