ओबीसी प्रबोधनकारांची सुरक्षा ओबीसी सुरक्षा दल स्विकारणार

0
5
सत्यपाल महाराजावरील हल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकार्याना निवेदन
गोंदिया,दि.01-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या सयुक्तवतीने बुधवार(दि.३१)ला बहुजन समाजाचे प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्यावर मुंबई येथे झालेल्या हल्याच्या निषेध नोंदविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांना निवेदन सादर करण्यात आले.या निवेदनात ओबीसी समाजातील प्रबोधनकारावरील हल्ले रोखण्यासाठी त्या प्रबोधनकारांची सुरक्षा ओबीसी सुरक्षा दल स्विकारणार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.सोबतच मनुवादी मानसिकतेच्या संघटनेवर बंदी घालण्यासोहतच सवैधानिक हक्क आणि अधिकाराची जनजागृती करण्यार्या बहुजन प्रबोधनकारावर सातत्याने होत असलेले हल्ले हे मनुवादी विचारसरणी लादून सवैधानिक समतेला धोका पोचविण्याचे काम करीत असल्याने अशांवर व सत्यपाल महाराजावंर हल्ला करणार्याला कडक शिक्षा देण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतेवेळी ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वराडे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संघटक खेमेंद्र कटरे, उपाध्यक्ष कैलास भेलावे,शिशिर कटरे,पेमेंद्र चव्हाण,राजेश नागरीकर,गणेश बरडे,जितेश राणे,सुनिल भोंगाडे,सुनिल पटले,राजकुमार प्रतापगडे आदी उपस्थित होते.यावेळी उपजिल्हाधिकारी महिरे यांनी आेबीसी संघटनेचे निवेदन शासन स्तरावर पोचविण्याचे आश्वासन देत जातप्रमाणपत्रामध्ये कुठेच पोटजात उल्लेख करण्यासंबधीचा शासन निर्णय नसल्याची माहिती शिष्टमंडळाला दिली.