नागपूर कॅन्सर हॉस्पिटल अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे रविवारी उदघाटन

0
11

नागपूर,दि.3 : नागपूर कॅन्सर हॉस्पिटल अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे उद््घाटन येत्या ४ जून रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या इन्स्टिट्यूटचे निदेशक व कर्कशल्यचिकित्सा विभागप्रमुख, अजय मेहता यांनी पत्रकारांशी बोलताना नागपुरात एकछत्री सर्व सोयीयुक्त सर्वंकष कर्करोग चिकित्सालय असावे, हे आमचे स्वप्न पूर्णत्वास आले असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी या ग्लोबल हेल्थ केअर- नागपूर कॅन्सर हॉस्पिटल अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे औपचारिक उद््घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ४ जून, २0१७ रोजी सकाळी १0 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती दिली. ज्या व्यक्तींनी भयंकर विनाशी कर्करोगाशी धैर्य, निश्‍चय व साहसाने लढून विजय प्राप्त केला आहे, अशा लोकांना ‘कर्करोग लढवय्ये वीर पारितोषिक’ प्रदान करून सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या इन्स्टिट्यूटविषयी बोलताना त्यांनी १३२ खाटांची आंतररुग्ण सेवा देण्यासाठी अद्ययावत सुसज्ज यंत्रसामग्री, चिकित्सा व सुश्रुशा आम्ही सुरू करीत असल्याचे सांगून यात मध्य भारतातील पहिली ‘ट्रू बीम वीथ स्टिरियोटॅक्टिक रेडियो सर्जरी’, ‘पॉझिटिव्ह एमिशन टोमोग्राफी’ ऊर्फ पेट स्कॅन, प्रगत ट्रायेस्टा पॅथॉलॉजी लेबॉरेटरी जेथे ट्युमर मार्कर्स, इम्युनो हिस्टो केमिस्ट्री (आयएचसी,) रेणू व गुणसूत्र, जनुकांच्या तपासण्या, बोनमॅरो ट्रान्सप्लांट युनिट, विषेशोपचार राखीव खाटा, डे-केअर किमोथेरपी दिवसाच भरतीराहून- कर्करोगनाशक औषधोपचार कक्ष, रचनात्मक पद्धशीरपणे बांधण्यात आलेली ४ शस्त्रक्रिया गृहे, वैद्यकीय व शल्यउपचार, अतिदक्षता सेवासुश्रुशा व कर्करोग मानसोपचार विभाग राहणार असल्याचे सांगितले. या वेळी कर्करोग मानसोपचार विभागप्रमुख डॉ. सुचित्रा मेहता यांनी सांगितले की, ४ जून, २0१७ रोजी कर्करोग विजेतेदिनाचे औचित्य साधून मध्य भारतवासींयांना आम्ही हे ‘ग्लोबल हेल्थ केअर- नागपूर कॅन्सर हॉस्पिटल अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’ सर्मपित करीत असल्याचे सांगितले. ‘ग्लोबल हेल्थ केअर – नागपूर कॅन्सर हॉस्पिटल अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट’चे बधिरीकरणविद्याशास्त्र विभागप्रमुख व मुख्य अतिदक्षता सुश्रुशातज्ज्ञ डॉ. अनंत सिंह यांनी सांगितले की, ४ जून, २0१७ रोजी ‘सेलेब्रेटिंग लाइफ आफ्टर कॅन्सर’ (कर्क रोगपश्‍चात जीवन साजरे करा) या संदेशासाठी एक प्रभात फेरी इन्स्टिट्यूट वांजरी येथून सकाळी काढण्यात येणार असून ग्लेबल हेल्थ केअरचे अध्यक्ष डॉ. अजयकुमार हे हिरवी झेंडी दाखवून पदयात्रेला रवाना करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला डॉ. मनजित राजपूत, विकृतिशास्त्रज्ञ, डॉ. वैभव सोनोवणी, क्ष-किरणोपचारतज्ज्ञ व डॉ. शिरीश भामरे आदी उपस्थित होते.