23.3 C
Gondiā
Wednesday, August 19, 2026
Home विदर्भ नक्षल्यांच्या नावावर खंडणी मागणाऱ्या दोघांना पकडले

नक्षल्यांच्या नावावर खंडणी मागणाऱ्या दोघांना पकडले

0
18

गडचिरोली,दि.08- धानोरा तालुक्यातील येरकड येथे जाऊन ग्रामस्थांना आपण नक्षलवादी असल्याची बतावणी करून खंडणी मागणाऱ्या दोन इसमांना ग्रामस्थांनी पकडून थेट धानोराच्या पोलीस ठाण्यात आणले. या घटनेसंदर्भात धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित ठिके, धानोराचे प्रभारी पोलीस निरिक्षक नरेंद्र मुंडे तसेच येरकड पोलीस मदत केंद्राचे प्रभारी पोलीस अधिकारी देशमुख यांनी सदर घटनेस दुजोरा दिला.सदर प्रकरणाची चौकशी सुरू आहे.