भंडारा येथील महिला रुग्णालयाला मंजूरी-माजी आ.भोंडेकर

0
7

भंडारा,दि.11 : येथील बहूप्रतिक्षित महिला रूग्णालयाला अखेर ६ जूनला मंजूरी मिळाली आहे. उच्चस्तरीय समितीने या रूग्णालयाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असून यासाठी ४३ कोटी ८४ लाख ८८ हजार रूपये मंजूर केले आहे. यातून सुसज्ज रूग्णालय उभारण्यात येणार असून याचे उद्घाटन महिनाभरात करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी  शनिवारला पत्रपरिषदेत दिली.

महिला रूग्णांना सुविधा मिळाव्या यासाठी भंडारा येथे महिला रूग्णालयाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पडून होता. माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी वेळोवळी हा मुद्दा रेटून धरला. दरम्यान तांत्रिक अडचणींमुळे महिला रूग्णालयाचा प्रस्ताव थंडबस्त्यात होता. यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. ५ कोटींवरील निधीच्या बांधकामाच्या मंजुरीचा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीकडे वर्ग करण्यात आला होता. यासाठी नरेंद्र भोंडेकर यांनी हा मुद्दा पालकमंत्री डॉ. दिपक सावंत यांच्या माध्यमातून शासनाकडे लावून धरला होता.या रूग्णायलासाठी ४३ कोटी ८४ लाख ८८ हजार रूपये मंजूर करण्यात आलेले आहे. रूग्णालयाचे भूमिपूजन महिनाभरात होणार असल्याचीही माहिती भोंडेकर यांनी यावेळी दिली. यावेळी पंचायत समिती उपसभापती ललीत बोंद्रे, शहरप्रमुख सुर्यकांत इलमे, अनिल गायधनी, सुरेश धुर्वे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.