पालिकेचे विहीर बांधकाम निकृष्ठ दर्जाचे -नगरसेवक ढांकुनवारांचा आरोप

0
13

चिमूर,दि.16- येथील चिमूर नगर परिषदेच्या प्रभाग १४ मध्ये  एका जुन्या विहीरीचे  नव्याने सुरु करण्यात आलेले बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे होत असून विहीर बांधकामात नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप नगरसेवक विनोद ढांकुनवार यांनी केला आहे.सोबतच संबंधित अभियंत्याचे कंत्राटदाराला अभय असल्याचेही म्हटले आहे. नगर परिषद अंतर्गत येत असलेलया प्रभाग १४ मधील सातनाला जवळ जुन्या विहीरीचे नुतनीकरणाचे सुरू आहे. हे काम गेल्या चार पाच महिन्यापासून नगरोत्थान योजनेतून करण्यात येत असून फक्त  २१ फूट खोदकाम  झाले अाहे. या कामासाठी पालिकेने संबंधित कंत्राटदाराला ५ लक्ष ४९ हजार ४६३ रुपयाचा धनादेश सुध्दा दिला असून बांधकामात वापरण्यात येत असलेला लोहा सिमेंटची गुणवत्ता व प्रमाण योग्य नसल्याचे नगरसेवकाचे म्हणने आहे.या सर्व बांधकामाकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने जिल्हा प्रशासनाने यावर लक्ष द्यावे अशी मागणी नगरसेवक ढांकुवार यांनी केली आहे.