28.1 C
Gondiā
Saturday, August 15, 2026
Home विदर्भ तत्कालीन सीईओ अहिरेंच्या काळातील कामांच्या चौकशीचे आदेश

तत्कालीन सीईओ अहिरेंच्या काळातील कामांच्या चौकशीचे आदेश

0
29

भंडारा,दि.22 : जिल्हा परिषदचे तत्त्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या संपूर्ण कामांच्या तपासणीचे आदेश बुधवारला सांयकाळी धडकले. जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व विभागातील कामांची विशेष तपासणी आज गुरूवारपासून सुरू होणार आहे. यासंबंधीचे आदेश उपायुक्त (आस्थापना) कमलकिशोर फुटाणे यांनी बजावले आहेत. या आदेशामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.सदर विशेष तपासणी पथकाची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या पथकाला आवश्यक दस्ताऐवजासह योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या आदेशाचे पालन जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.