24.3 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ आ.वड्डेटीवारांचे वनसंरक्षक कार्यालयाला ताला ठोको आंदोलन

आ.वड्डेटीवारांचे वनसंरक्षक कार्यालयाला ताला ठोको आंदोलन

0
23

चंद्रपूर,दि.23- जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात वाघाने मागील काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. याच वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दोघांनी आपला जीव गमावला तर सहा व्यक्ती गंभीर झाले आहेत. त्यामुळे नागरिकांत तीव्र रोष व्यक्त होत आहे. मागील आठवड्यात हळदा येथील नागरिकांनी वाघाला जेरबंद करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. मात्र यावर वनविभागाकडून कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आज ब्रम्हपुरी मतदारसंघाचे आमदार व विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला ताला ठोको आंदोलन करण्यात आले. गावकऱ्यांवर हल्ला करणाऱ्या या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करावे या मागणी साठी हे आंदोलन करण्यात आले. वाघाने दोन जणांना ठार मारून ६ लोकांना जखमी केले तरी वनविभागाला याचे काही वाटत नाही का असा प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. याच वाघाला ठार मारण्यासाठी हळद येथे नागरिकांनी तीव्र आंदोलन केले होते.या आंदोलनात चंद्रपूर जिल्हा काँग्रेसच्या नेत्यासह ब्रम्हपुरी तालुक्यातील नागरीकही सहभागी झाले होते.