मलमपल्ली येथे वीज कोसडल्याने 2 महिला जखमी

0
5

आलापल्ली,दि.27-अहेरी तालुक्यातील मलमपल्ली येथील रोप वाटिकेच्या रोजंदारीच्या कामावर असलेल्या महिलांच्या अंगावर वीज कोसडल्याने दोन महिला गंभीर जखमी झाल्याची घटना आज 27 जून रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली.समक्का शामराव मडावी, माधुरी यशवन्त दुर्गे जखमी महिलांची नावे आहेत .त्यांना उपचारासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे .