विकास प्रक्रियेत लोकांचा सहभाग अतिमहत्त्वाचा

0
6

लाखनी,दि.01: केंद्र सरकार विविध कल्याणकारी योजना राबवित असून त्यातून लोकांचा विकास साध्य करणे हे महत्त्वाचा उद्देश आहे. या विकास प्रक्रियेत प्रत्येक व्यक्तीचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे मत आमदार राजेश काशिवार यांनी भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने लाखनी तालुक्यातील शिवणी (मोगरा) येथे आयोजित विशेष प्रचार अभियानात बोलतांना व्यक्त केले.

या विशेष प्रचार अभियानात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, शिवणीच्या सरपंच माया कुथे, पंचायत समिती सदस्य मोनाली गाढवे, गटविकास अधिकारी मिलींद बडगे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आर.एस.खांडेकर, जिल्हा साथरोग अधिकारी रवी कापगते, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राहूल शेंडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस.आर. निर्वाण, बँक आॅफ महाराष्ट्र चे उपव्यवस्थापक रचित शुक्ला, नवचैतन्य विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एम.राऊत तसेच क्षेत्रिय प्रचार अधिकारी मनोज सोनोने यावेळी उपस्थित होते.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रिय प्रचार कार्यालयाच्या वतीने आयोजित या विशेष प्रचार अभियानात बोलतांना आमदार काशिवार पुढे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात लोकशाहीचे महत्व प्रकट करतांना प्रत्येक व्यक्तीच्या विकासावर भर देण्यात आला असून हा विकास साध्य करण्यासाठी प्रत्येकाने लोकशाही प्रक्रीयेत सहभागी होवून विकास साध्य करण्यासाठी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.