पालकमंत्र्यांच्या हस्ते आलापल्लीत वृक्षरोपण

0
7

आलापल्ली, दि.07-चार कोटी वृक्ष लागवड़ कार्यक्रमांतर्गत आज आलापल्ली येथील जैवविविधता उद्यान परिसरात राज्याचे आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते वृक्ष रोपण आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून गडचिरोली वनवृताचे मुख्यवनसंरक्षक श्री डब्लू .आय. यॉटबान उपस्थित होते. तसेच आलापल्ली वन विभागाचे उपवनसंरक्षक ,भामरागड वन विभागाचे उपवनसंरक्षक तसेच वनअधिकारी व वन कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.