क्रांतीवीर नारायण उईके जन्मशताब्दी सोहळा व आदिवासी मेळावा उत्साहात

0
11

गोंदिया,दि.११ :गोवारी समाजाला आदिवासी च्या यादीत प्रथमतः समाविष्ट करणारे माजी आमदार क्रांतीवीर नारायणसिंह उईके यांच्या मूळजन्मगावी त्यांचा जन्मषताब्दि सोहळा आयोजित होणे ही गौरवास्पद बाब आहे. त्यांनी सुरू केलेली गोवारी समाजाची ही लढाई लढण्याकरिता आता समस्त आदिवासी बांधव तयार आहेत. राज्य षासनाच्या दरबारी ही बाब पोहचविण्याकरिता पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना. बडोले प्रयत्न करणार तर राज्यातून आलेल्या या प्रस्तावाचा केंद्रात पाठपुरावा मी स्वतः करून आदिवासी गोवारी समाजाला न्याय मिळवून देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन गोंदिया-भंडारा चे खासदार नाना पटोले यांनी केले.
मागासलेल्या आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी लढणारे क्रांतीवीर माजी आमदार नारायणसिंह उईके यांचा जन्मशताब्दी सोहळा तसेच आदिवासी मेळावा आज ११ जुलै रोजी गोंदिया जवळील कंटगी येथील मयुर लॉन येथे उत्साहात पार पडला. हा सोहळा आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती, गोंडवाना व आदिवासी गोवारी समाज कटंगीकलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात आदिवासी सेवकांचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे उदघाटन खासदार नाना पटोले यांच्या हस्ते झाले.यावेळी अतिथी म्हणून राज्याचे सामाजिक न्याय व विषेष सहायय मंत्री तसेच गोंदिया जिल्हयाचे पालकमंत्री राजकुमार बडोले ,जि.प. सभापती छाया दसरे,माजी जि.प.उपाध्यक्ष विनोद अग्रवाल,गोकुल बोपचे,कृष्णा सर्फा,उषाकिरण आत्राम,होमराज ठाकरे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.पुढे खा. पटोले म्हणाले की आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी क्रांतीवीर नारायणसिंह उईके यांनी शासनाशी लढा दिला. सन १९५० च्या पहिल्या बिलात गोवारी जमातीचे नाव नाही म्हणून १९५३ व१९५५ मध्ये गोवारी समाज आदिवासीच आहे, असे सिद्ध करीत केन्द्र व राज्य शासनास गोवारी नोंद घेण्यास भाग पाडले .मात्र दुर्दैवाने अनुसूचित जमाती च्या यादीत ‘गोंड गोवारी ‘ अशी संयुक्त नोंद आली.परंतु, अद्यापपर्यंत गोवारी समाजाला न्याय देण्यात आला नाही. हा लढा आजघडीला सुरू असताना क्रांतीवीर नारायणसिंह उईके यांच्या स्मरणार्थ त्यांचा २०१७ हा जन्मशताब्दी वर्ष व जयंती सोहळा निमित्ताने आदिवासी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमानिमित्त डॉ. विनायक तुमडाम, माणिक कौरोथी , कवियित्री सौ. उषाकिरण आत्राम, दशरथ मडावी, वामनराव शेडमाके, कृष्णकुमार चांदेकर, गुलाबसिंग कोडापे, दुर्गाप्रसाद कोकोडे, गोपालसिंह उईके, सुभाष न्यायमूर्ती, महाराजसिंह कोडापे व उदेलाल सोरले यां समाजसेवकांचा खासदार नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन समितीचे निमंत्रक दामोदर नेवारे यांनी तर आभार दिनेश कोहळे यांनी मानले.