संग्राम कक्षातील पर्वेतेची चौकशी करून कावळेची नियुक्ती रद्द करा

0
12

गोंदिया-गोंदिया जिल्हा परिषदेतील संग्राम कक्षाच्या माध्यमातून ज्या ग्रामपंचायतीमध्ये संगणक चालकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.त्या वादग्रस्त ठरल्या नसतील असे कधीच झाले नाही.त्यातच काही दिवसापूर्वी गोंदिया तालुक्यातील सेजगाव खुर्दे गावाकरिता करण्यात आलेल्या भरतीमध्ये संग्राम कक्षातील विशाल पर्वेते यांनी नियुक्ती करतांना घोळ करून कमी गुण मिळालेल्या दुर्गा कावळे नामक युवतीची नियुक्ती करून संगणक चालक भरतीमध्ये आम्ही करू तो कायदा अशी भूमिका घेत पात्र उमेदवारावर अन्याय केल्याचा आरोप चंद्रप्रकाश कावळे यांनी केला आहे.कावळे यांनी दुर्गा कावळे यांच्या नियुक्तीची चौकशी करून विशाल पर्वेतेच्या कार्याची सुध्दा चौकशी व्हायला हवी अशी मागणी केली आहे.१६ डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परीक्षेची प्रश्नपत्रिका ही बाहेर काढून उमेदवाराकडून पर्वते यांनी सोडवून घेतली.जेव्हा परीक्षेचे नाव ऑनलाइन देण्यात आले होते.५० गुणासाठी २५ प्रश्न ठेवण्यात आले होते.प्रश्नपत्रिकेची तपासणी जेव्हा करण्यात आली,तेव्हा संगणक परिचालकासाठी परीक्षेला आलेल्या प्रीती केशवराव डोहळे यांना ४८ गुण,चंद्रप्रकाश तिलकचंद कावळे ४०,प्रमिला नागभिरे २६ आणि दुर्गा कावळे हिला ३६ गुण मिळाले.यामध्ये प्रीती डोहळे हिने याआधी सुध्दा परीक्षा दिली तेव्हा ती दुसèया क्रमांकावर होती.त्यावेळी निवड झालेल्या संगणकचालकाने राजीनामा दिल्याने नव्याने दिलेल्या जाहिरातीनुसार तिनेही अर्ज केला आणि सर्वाधिक गुण मिळविले,असे असतानाही पर्वते यांनी कु.डोहळे यांच्यावर अन्याय का केला हा मुख्य प्रश्न उपस्थित झालेला आहे.त्यातच दुर्गा कावळे यांना देण्यात आलेल्या गुणामध्येच घोळ असल्याचा आरोप चंद्रप्रकाश कावळे यांनी केला असून १० क्रास झालेल्या प्रश्नांना पर्वते यांनी गुण दिले,त्यामुळे त्या प्रश्नपत्रिकेचीच पुन्हा तपासणी व्हावी अशीही मागणी समोर केली आहे.त्यानंतर घेण्यात आलेल्या मुलाखतीचे सुध्दा नियोजन नव्हते.गुण व वेळेचा उल्लेख नव्हता.फक्त ज्या कागदावर उमेदवारांचे नाव व स्वाक्षरी होती,त्या ठिकाणी मार्किंग करीत नियुक्ती कुणाची होणार लगेच सांगण्यात येणार असे सांगितले.परंतु पर्वते यांनी तसे न करता नियुक्ती प्रकरण दोन दिवस लाबंवून ठेवले.आणि तिसèया दिवशी दुर्गा कावळेंची नियुक्ती संगणक परिचालकासाठी करण्यात आल्याचे कळविले.या प्रकरणात मोठा व्यवहार झाल्याची शंका असल्याने निष्पक्ष चौकशीची मागणी करण्यात आली आहे.विशेष म्हणजे २२ डिसेंबरला दुरध्वनीकरुन दुर्गा कावळे यांना २३ डिसेंबरला बोलावून संग्राम कक्षातील संगणकावर टाइqपग करायला लावून अवघ्या दोन ते तीन मिनिटातच त्यांच्या हातात नियुक्ती पत्र दिले.अशाचप्रकारे पर्वते यांना नियुक्ती पत्र द्यावयाचे होते,तर आधीची प्रकिया पार पाडण्याची गरजच काय होती अशा प्रश्न झाला असून मुकाअ साहेब विशाल पर्वते यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्वच संगणक चालक भरतीची चौकशी करून पर्वतेच्या काळ्या कारन्यामाची पोलखोल करून अन्यायग्रस्तांना न्याय देतात की पर्वेतेच्या या गैरकारभाराला समर्थन देतात याकडे आता लक्ष लागले आहे.