पालकमंत्रीच्या प्रयत्नामुळे गोंदिया जिल्ह्यातील विकास कामांना गती

0
9

मुंबई, दि. 1 (प्रतिनिधी) : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री म्हणून राजकुमार बडोले यांनी विभागावर आपल्या कामाचा विशेष ठसा उमटवला असतानाच गोंदिया जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी चिकाटीने प्रयत्न करुन भरघोस निधी मंजूर करण्यात यश मिळवले. याबाबत त्यांना छेडले असता बडोले म्हणाले की,
पावसाळी अधिवेशनात आज खर्चाच्या पुरक मागण्यांमध्ये गोंदिया जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मिळवला आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे होस्टेल असो, तरुणांसाठी कौशल्य विकास असो, आय.ए.एस., एअर होस्टेसचे प्रशिक्षण असो गोंदिया जिल्हा अग्रेसर राहिला आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात
सडक अर्जुनी येथे दिवाणी न्यायाधिश निवासस्थानासाठी ५६. २७ लाख रुपये तर ,सावंगी येथील विश्रामग्रुहाच्या प्रांगणातील अति महत्वाच्या व्यक्तींसाठी बैठक कक्षाच्या बांधकामासाठी १८१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
गोंदिया येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधिल फर्निचरसाठी तब्बल ९३६ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून सदरच्या कामावर ७८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे बडोले म्हणाले.
गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी यापूर्वीच ४४९ कोटी रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे. याशिवाय गोंदिया येथील जी.एन एम. प्रशाळेच्या बांधकामासाठी ९८२ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचेही बडोले म्हणाले.
जुनेवाणी या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी १८९ लाख रुपयांची कामे नव्याने मंजूर करण्यात आली आहेत. गोंदिया जिह्याच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवण्यात मला यश आले आणि माझ्या शासनानेही मी दिलेल्या सादाला तातडीने प्रतिसाद दिला, यासाठी मुख्यमंत्र्यांचाही मी आभारी असल्याचे बडोले म्हणाले.