ऑनलाइन ‘सात-बाराङ्क योजनेला गोंदियात ठेंगा

0
10

गोंदिया-राज्यसरकारने गेल्या वर्षभरापूर्वीच राज्यातील सर्व जिल्ह्यातून शेतकèयांना ऑनलाइन सात बारा देण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने प्रशासकीय यंत्रणेला आदेश दिले होते.वास्तविक १ एप्रिल १४ पासूनच या उपक्रमाची सुरवात करण्यात येणार होती.परंतु जिल्हाधिकाèयांच्या अनास्थेमुळे राज्यात ही यंत्रणा यशस्वी होऊ शकली नाही.त्यातच ३१ जानेवारी १५ पर्यंत सर्व कागदपत्र ऑनलाइन करण्याचे निर्देश असतानाही गोंदिया जिल्ह्यात मात्र आमगाव तालुका वगळता इतर तालुक्यांनी ठेंगा दाखविला आहे.
तर राज्यसरकारच्या महसूल विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील सात -बारा हे ऑनलाइन उपलब्ध हो़णार नसल्याने नागरिकांना यापासून वंचित राहावे लागणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गोंदिया व तिरोडा येथील काही निवडक गावांची १९१०-१४ मध्ये झालेल्या जमिनीच्या मोजणीनंतर एकदाही मोजणी महसूल व भूमिअभिलेख विभागाने न केल्याने या दोन्ही तालुक्यातील सात बारा ऑनलाइन योजना अर्धवट राहणार आहे.जोपर्यंत सर्वच जमिनीची मोजणी होऊन त्याची नोंद दस्तावेजावर होणार नाही,तोपर्यंत ऑन लाईन होणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.गोंदियातील गोंदिया बूज,गोंदिया खुर्द,कारंजा,कुडवा,तिरोडा येथील बेलाटी अशा १० ते १५ गावातील जमिनीची मोजणी गेल्या १०० वर्षात न झाल्याने या दोन तालुक्यातील ऑनलाइन सात बारा योजना रखडली जाणार आहे.तर इतर तालुक्यातील काम ही संथगतीने सुरू असल्याचे निर्देशनास आले आहे.या सर्व बाबींकडे जिल्हाधिकारी यांचे दुर्लक्ष झाल्यानेच आज गोंदिया जिल्ह्यातील सात बारा ऑनलाइन होण्यास उशीर होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.आमगाव तालुका वगळता कुठल्याही तालुक्यातील प्रकिया अद्यापही पूर्ण झाली नसल्याने ३१ जानेवारीपर्यंत कुठल्याही परिस्थितीत काम आटोपण्याचे आदेश वरिष्ठांच्या दट्यानंतर जिल्हाधिकांèयानी दिले आहेत.