बफर क्षेत्राच्या गावातील कुटूंबांना गॅस कनेक्शन देणार- राजकुमार बडोले

0
12

चिखली येथे गॅस कनेक्शनचे वाटप
गोंदिया,दि.१७: नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील बफर क्षेत्रामध्ये येणाऱ्या गावांच्या विकासासाठी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांना देण्यात येईल. बफर क्षेत्रातील गावांचे इंधनासाठी वनावर असलेले अवलंबीत्व कमी करण्यासाठी सर्वच कुटूंबांना गॅस कनेक्शन देण्यात येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
१६ ऑगस्ट रोजी सडक/अर्जुनी तालुक्यातील चिखली ग्रामपंचायत येथे वन्यजीव विभागाच्या वतीने डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनेतून गावातील कुटूंबांना गॅस कनेक्शनचे वाटप पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जि.प.सदस्य माधुरी पातोडे, पं.स.सदस्य गिरीधारी हत्तीमारे, राजेश कठाणे, वन्यजीव विभागाच्या उपविभागीय वन अधिकारी गीता पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.राठोड, सरपंच सुधाकर कुर्वे, नायब तहसिलदार अखिल मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.